मावळ : 'त्या' गोळीबार प्रकरणातील हे आहेत संशयित आरोपी, पाहा फोटो

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 ऑगस्ट 2020

पोलिसांनी गुन्ह्यातील संशयित आरोपीची रेखाचित्र तयार करून सर्व पोलिस ठाण्यांना पाठवली आहेत.

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यातील वहाणगाव येथील संकल्प फार्महाऊसचे व्यवस्थापक मिलिंद मधुकर मणेरीकर (वय ५०, रा. तळेगाव दाभाडे) यांच्यावर गोळीबार करून फरार झालेल्या दोन संशयित आरोपींची रेखाचित्रे वडगाव पोलिसांनी प्रसिद्ध केली आहेत. हे कोणाला आढळून आल्यास माहिती देण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी केले आहे.

Image may contain: 1 person, text that says 'VADGOANMAVAL VADGOAN POLICE STATION CR.NO.453/2020 U/S- 307,302,34.I ARMS ACT,3,25'

मणेरीकर हे गेल्या २२ तारखेला सकाळी  कंपनीच्या एक्सयुव्ही कारमधून तळेगाव येथून वहाणगाव येथील संकल्प फार्महाऊस येथे जात होते. त्यावेळी पाठीमागून एका नंबर प्लेट नसलेल्या मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी पत्ता विचारण्याचा बहाणाकरून त्यांची गाडी थांबवली. मणेरीकर यांनी काच खाली घेतली असता त्या अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गावठी कट्ट्यातून गोळ्या झाडल्या. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. २९ तारखेला त्यांचा मृत्यू झाला. 

Image may contain: 1 person, text that says 'VADGOANMAVAL VADGOA POLICE STATION CR.NO.453/2020 U/S- 307,302,34.IPC ARMS ACT,3,25'

पोलिसांनी गुन्ह्यातील संशयित आरोपीची रेखाचित्र तयार करून सर्व पोलिस ठाण्यांना पाठवली आहेत. तसेच, सोशल मीडियावरही व्हायरल केली आहेत. हे संशयित आरोपी आढळून आल्यास वडगाव मावळ पोलिस ठाणे, पुणे ग्रामीण कार्यालय किंवा ९७६७४३८०९८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police drawings of suspects in shooting case at vahangaon maval