अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या हॉटेलवर पोलिसांचा छापा 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 November 2020

चऱ्होलीतील वडमुखवाडी येथील द्वारका फॅमिली रेस्टॉरंट या हॉटेलमध्ये अवैधरित्या देशी, विदेशी दारू व बिअरची विक्री होत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार हा हॉटेलवर छापा टाकला असता हॉटेलचा चालक, मालक शाम तापकीर, संतोष जाधव हे त्यांच्या हॉटेलमध्ये पंधरा जणांना एकत्र बसवून दारुची विक्री करताना आढळून आले.

पिंपरी : अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या हॉटेलवर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने छापा टाकला. ही कारवाई चऱ्होली येथे करण्यात आली असून पोलिसांनी पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त केला. 

Bihar Election: बिहारमध्ये आम्ही जाणीवपूर्वक लक्ष घातले नाही; शरद पवारांचा टोला
 
चऱ्होलीतील वडमुखवाडी येथील द्वारका फॅमिली रेस्टॉरंट या हॉटेलमध्ये अवैधरित्या देशी, विदेशी दारू व बिअरची विक्री होत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार हा हॉटेलवर छापा टाकला असता हॉटेलचा चालक, मालक शाम तापकीर, संतोष जाधव हे त्यांच्या हॉटेलमध्ये पंधरा जणांना एकत्र बसवून दारुची विक्री करताना आढळून आले.

#BoycottAmazon : नेटकरी संतापले; अॅमेझॉनवर हिंदू देवी-देवतांची चित्रे असलेली अंतर्वस्त्र, पायपुसण्या​

या छाप्यात हॉटेलमधील दहा हजार 240 रूपयांची रोकड व 39 हजार 499 रूपये किंमतीच्या दारूच्या बाटल्या असा एकूण 49 हजार 739 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर हॉटेलच्या चालक, मालकावर दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आला. तसेच अकरा ग्राहक व हॉटेलमधील चार कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. दिघी पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

Bihar Election: 'तेजस्वी' झळकणार अन् 'नितीश'जींची पिछेहाट होणार!​

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police raid hotel selling liquor illegally