नवरा-बायकोचं भांडणं अन् बायकोनं घेतली नदीत उडी, मग पोलिसांनी...

सुवर्णा नवले
रविवार, 28 जून 2020

हाताला काम नसल्याने नवरा-बायकोचं कडाक्‍याचं भांडणं झाल. अन्‌ रविवारी (ता. 28) सकाळी दहाच्या सुमारास पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे-गुरव येथे राहणाऱ्या 55 वर्षीय महिलेनं रागातून थेट सांगवीतील पवनानगर स्मशानभूमीजवळील नदीत उडी मारली.

पिंपरी : हाताला काम नसल्याने नवरा-बायकोचं कडाक्‍याचं भांडणं झाल. अन्‌ रविवारी (ता. 28) सकाळी दहाच्या सुमारास पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे-गुरव येथे राहणाऱ्या 55 वर्षीय महिलेनं रागातून थेट सांगवीतील पवनानगर स्मशानभूमीजवळील नदीत उडी मारली. याबाबत कंट्रोल रूममधून सांगवी पोलिस ठाण्यात कॉल धडकताच शर्थीचे प्रयत्न करत अवघ्या काही क्षणांत महिलेचा जीव वाचविण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. त्यामुळे खाकी वर्दीतल्या माणुसकीचं पुन्हा एकदा दर्शन झालं आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

सांगवी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रेय पोपटराव गुळीग यांनी सहकारी पोलिस नाईक अमोल लावंड, पोलिस शिपाई हंसराज गोरे, दीपक पिसे यांच्यासह सांगवीजवळील पवना नदीकडे धाव घेतली. पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी टीमला मार्गदर्शन केले. महिलेचे हात पाण्यावर तरंगताना दिसताच त्यांनी सोबत आणलेली 50 फूट दोर नदीत टाकला. आपत्ती व्यवस्थापनाची वाट न पाहता दोरही त्यांनी मिळवला. महिलेची समजूत काढत तिला पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर महिला बेशुद्ध पडली. तत्काळ तिला औंध रुग्णालयात दाखल करण्यात आले. चार तासाच्या उपचारानंतर ती आता बरी झाली आहे. मात्र, नवऱ्याविरोधात शिवीगाळ केल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. महिलेला एक मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे.

हेही वाचा- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आर्किटेक्ट विद्यार्थ्यांचा 'हा 'पॅटर्न ठरणार महत्त्वाचा

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Image may contain: 1 person, standing, hat, outdoor and closeup
दत्तात्रेय गुळीग, सहायक पोलिस निरीक्षक

दोघेही पती-पत्नी हे पैशाच्या चणचणीवरून भांडत होते. दोघेही मजूर असल्याचे समजत आहे. 'कुठेतरी काम-धंदा शोधा, घरात बसून राहू नका', असं पत्नीने पतीला सांगताच पतीने मारहाण करत भांडणं करण्यास सुरुवात केली. हा राग मनात धरून तिने आत्महत्येचा पर्याय निवडला. मात्र, नदीकाठ परिसरातील नागरिकांनी शंभर नंबरवर कॉल करताच पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेचे प्राण वाचले. मात्र, अशा बिकट परिस्थितीत एकीकडे आत्महत्यांचे सत्र सुरु असताना एका महिलेचा जीव वाचविण्यात पोलिसांना यश मिळाल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police rescued the drowning woman at sangavi