Video : विनाकारण फिरणाऱ्या वाहनचालकांनो आता...

Video : विनाकारण फिरणाऱ्या वाहनचालकांनो आता...

पिंपरी : नाशिकहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून कसून तपासणी सुरू आहे. तसेच, विनाकारण फिरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

कोरोनामुळे सध्या संचारबंदी सुरू आहे. त्यामुळे विनाकारण कोणालाही फिरण्यास परवानगी नाही. केवळ दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी दिलेल्या वेळेत, अत्यावश्‍यक सेवेतील नागरिक आणि पासधारकांनाच रस्त्याने फिरता येते. प्रशासनाकडून गेले काही दिवस याबाबत जनजागृती सुरू आहे. तसेच पोलिसांकडूनही आतापर्यंत सुमारे पाच हजारांहून अधिक जणांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, तरीही विनाकारण फिरणाऱ्यांमध्ये कायद्याची दहशत बसलेली नसल्याचे दिसून येते. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नाशिक फाटा चौकात सकाळी चार पोलिस कर्मचारी उभे होते. पुण्याकडे जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्यात येत होती. अत्यावश्‍यक सेवेतील वाहनांवर तसा फलक लावलेला दिसत होता. त्यामुळे अशा वाहनचालकांना सोडण्यात येत होते. या व्यतिरिक्त बहुतेकजणांकडे साधे पास किंवा ई-पास होते. त्याची खातरजमा केल्यानंतरच पोलिस त्यांना पुढे सोडत होते. तसेच, पास नसलेल्या आणि फिरण्याबाबत कोणतेही समाधानकारक उत्तर देऊ न शकलेल्या वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात येत होते.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चार ते पाच दुचाकीस्वारांना पोलिसांनी अशा प्रकारे थांबवून ठेवले होते. या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच नियमांचा भंग करणाऱ्यांविरुद्ध अशाच प्रकारे कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण फिरू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com