पोलिसांच्या अंगावर मोटार घालून वीस फूट नेले फरफटत

Crime
Crime

पिंपरी - आरटीओ फिटनेस, टॅक्स पावती, वाहन इन्शुरन्स, पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट, अशी बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या चौघांना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने अटक केली. काळेवाडीतील आशीर्वाद सायबर कॅफे येथे केलेल्या कारवाईत एक लाख २१ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली. दरम्यान, यातील आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या एका पोलिसाच्या अंगावर आरोपीने मोटार घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तर आणखी एका पोलिसाला फरफटत नेले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राहुल प्रसाद गाैंड (वय ३३, रा. रुपीनगर, निगडी), बालाजी गोरख बाबर (वय २३, रा. थेरगाव), तुकाराम अर्जुन मगर (वय ३०, रा. काळेवाडी फाटा), प्रवीण दशरथ दळवे (वय २५, रा. चाकण) यांना अटक केली असून त्यांच्यासह इतर दोन आरोपींवर वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गाैंड हा काळेवाडी येथील आशीर्वाद सायबर कॅफेत विविध बनावट कागदपत्रे तयार करून देत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी (ता. ४) सापळा रचून छापा टाकला असता तो बनावट कागदपत्रे तयार करताना सापडला. गाैंड याच्या व्हाटसअपवर त्याचे इतर साथीदार माहिती देत होते. त्यावरून तो संगणकावर बनावट नाव, दिनांक, शिक्के, सिरीयल क्रमांक व फोटो तयार करून त्याची प्रिंट काढून काढायचा. त्याच्याकडील बनावट शिक्के मारून कलर झेराॅक्स प्रिंट काढून त्याचा फोटो व्हाटसअपव्दारे त्याच्या इतर साथीदारांना पाठवून देत असे. तसेच त्यांच्याकडून गुगल पेव्दारे पैसे स्वीकारत होता. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मोबाईल व संगणकामधील माहिती डिलिट करायचा.

संगणकावर बनावट कागदपत्रे तयार करीत असताना ग़ाैंड याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून तीन हजार ८८० रुपयांची रोकड, एक लाख १० हजार ४०० रुपयांचे बनावट कागदपत्रे तयार करण्याचे साहित्य, सात हजारांचा मोबाईल फोन, ३०० रुपये किमतीचे तीन बनावट रबरी स्टॅम्प, असा एकूण एक लाख २१ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सुमारे आठशे जणांना ही बनावट कागदपत्रे दिल्याची माहिती समोर येत आहे. 

वीस फूट नेले फरफटत
आरोपींना अटक करण्यासाठी सामाजिक सुरक्षा विभागाची तीन पथके तयार केली होती. आरोपी तुकाराम मगर याचाही पोलिस शोध घेत होते. दरम्यान, काळेवाडी फाटा येथे पहाटे पाचच्या सुमारास चारचाकीतून मगर जात असताना पोलिसांनी हात दाखवून त्याला थांबवले. 'आम्ही पोलिस असल्याचे पोलिस कर्मचारी संतोष बर्गे यांनी त्याला सांगितले. त्यावर त्याने ओळखपत्र दाखविण्यास सांगितले. बर्गे यांनी त्यांचे ओळखपत्र दाखविले. त्यावेळी आरोपीने मोटारीच्या काचा जोरात वर केल्या. त्यामुळे बर्गे यांचा हात अडकला. तरीही आरोपीने मोटार पुढे नेऊन १५ ते २० फुटांपर्यंत बर्गे यांना फरपटत नेले. यात ते जखमी झाले. तसेच मोटारीसमोर उभे असलेले पोलिस कर्मचारी संदीप गवारी यांच्या अंगावर मोटार घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. पाठलाग करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com