भोसरी : वस्ताद पोपटराव फुगे यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 September 2020

येथील वस्ताद पोपटराव सदाशिवराव फुगे (वय ६५) यांचे हृदयविकाराने निधन झाले.

भोसरी : येथील वस्ताद पोपटराव सदाशिवराव फुगे (वय ६५) यांचे हृदयविकाराने निधन झाले. ते पिंपरी-चिंचवड शहर कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष होते. भोसरी गावजत्रा मैदानात प्रमुख पंच म्हणूनही ते जबाबदारी पार पाडत होते. महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन व व्यायाम मंडळाचे ते वस्ताद होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तरुणांना कुस्तीचे प्रशिक्षण देण्याचे काम फुगे करत होते. ते फुगे-माने तालीम मंडळाचे अध्यक्षही होते. भोसरीत दरवर्षी होणाऱ्या वैष्णव विचार कीर्तन महोत्सव भरविण्यामध्येही त्यांचे सहाकार्य असायचे. त्यांना क्रीडा क्षेत्राची आवड असल्याने खेळाडूंसाठी स्पर्धेचे आयोजन करायचे. त्यांनी दहा वर्षापू्र्वी कै. सदाशिवराव फुगे यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय कुस्ती आणि कबड्डी स्पर्धा भरविली होती. आमदार महेश लांडगे यांचे ते समर्थक होते.  

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

नगरसेविका भीमाबाई फुगे यांचे ते पती, राजाराम महाराज फुगे यांचे थोरले बंधू, तसेच भाजपचे भोसरी युवा मंचचे अध्यक्ष सम्राट फुगे यांचे ते वडील होत. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, रुग्णालयात उपचार घेत त्यांनी कोरोनावर मात केली होती. त्यांना रुग्णालयातून घरीही सोडण्यात येणार होते. परंतु, तत्पूर्वीच सोमवारी (ता. २८) सकाळी त्यांना रुग्णालयातच हृदयविकाराने त्यांचे निधन झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: popatrao phuge passed away at bhosari