esakal | लोकसंख्या २५ लाखांवर; पण अंदाजपत्रकात केवळ तीन व्यक्तींचा सहभाग

बोलून बातमी शोधा

PCMC}

लोकाभिमुख प्रशासन चालविण्यावर भर देणार असल्याचे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी पंधरा दिवसांपूर्वी पदभार स्वीकारताना स्पष्ट केले होते. परंतु, शहराच्या विकासात लोकांचीच इच्छा नसेल तर, कसे लोकाभिमुख काम करणार? असा प्रश्‍न निर्माण होतो. कारण, महापालिका अंदाजपत्रक साडेपाच हजार कोटी रुपयांचे आहे.

लोकसंख्या २५ लाखांवर; पण अंदाजपत्रकात केवळ तीन व्यक्तींचा सहभाग
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - लोकाभिमुख प्रशासन चालविण्यावर भर देणार असल्याचे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी पंधरा दिवसांपूर्वी पदभार स्वीकारताना स्पष्ट केले होते. परंतु, शहराच्या विकासात लोकांचीच इच्छा नसेल तर, कसे लोकाभिमुख काम करणार? असा प्रश्‍न निर्माण होतो. कारण, महापालिका अंदाजपत्रक साडेपाच हजार कोटी रुपयांचे आहे. शहराची लोकसंख्या २५ लाखांवर आहे. त्यातील केवळ तीन व्यक्तींनी ४० लाखांची चार कामे सुचवली आहेत. याउलट १२८ नगरसेवकांनी २४९ कोटींपेक्षा अधिक रकमेच्या कामांचे प्रस्ताव ठेवले आहेत.

महापालिका अंदाजपत्रकात लोकांचा सहभाग असावा, यासाठी प्रशासन दरवर्षी दहा लाख रुपये खर्चाची कामे सुचविण्याचे आवाहन करते. परंतु, त्याला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे महापालिकेकडे नागरिकांकडून आलेल्या कामांच्या प्रस्तावावरून दिसते. काही नागरिक खासगी स्वरूपाची कामे सुचवतात, अशा कामांचे प्रस्ताव स्वीकारले जात नाहीत. नागरिकांनी सुचवलेली काही कामे अगोदरच नगरसेवकांनीही सुचवलेली असतात. त्यांचा समावेश अंदाजपत्रकात केलेला असतो. त्यामुळे नागरिकांचे प्रस्ताव स्वीकारता येत नाहीत. अशा कामांचे प्रमाण हे तुलनेने कमीच असते; पण नागरिकांनी अधिकाधिक कामांचे प्रस्ताव पाठवायला हवेत, असे महापालिका मुख्य लेखापाल जितेंद्र कोळंबे यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विरोधाभास

  • ५५८८.७८ कोटी - आयुक्तांचे अंदाजपत्रक 
  • २४९.२९ कोटी - स्थायी समिती १६ सदस्यांचे प्रस्ताव 
  • ४० लाख - २५ लाख लोकसंख्येतून चार प्रस्ताव 

नागरिकांनी सुचवलेली कामे
गेल्या वर्षीच्या अंदाजपत्रकात केवळ नऊ कामे नागरिकांनी सुचवली होती. यावर्षी त्यात पुन्हा घट होऊन अवघी चार कामे सुचवली आहेत. यात स्थापत्य विषयक तीन व विद्युत विषयक एका कामाचा समावेश आहे. स्थापत्य विषयक दोन कामे ‘अ’ व एक काम ‘ड’ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत आहे. विद्युत विषयक काम ‘ब’ क्षेत्रिय कार्यालय स्तरावरील आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आपण दरवर्षी प्रभागस्तरावर (क्षेत्रिय कार्यालय) नागरिकांकडून कामे सूचविण्याबाबत प्रस्ताव मागत असतो. सार्वजनिक हिताची दहा लाख रुपये खर्चापर्यंतची विकास कामे नागरिक सुचवू शकतात. त्या प्रस्तावांची छाननी करून प्रभाग अधिकारी त्या कामांचा समावेश त्यांच्या अंदाजपत्रकात करीत असतो. या वर्षी केवळ चार कामे सुचविले आहेत. 
- जितेंद्र कोळंबे, मुख्य लेखापाल, महापालिका

Edited By - Prashant Patil