लॉकडाउनमध्ये ही कामे रखडली नसती, तर जुनी सांगवीकरांवर ही वेळ आलीच नसती

लॉकडाउनमध्ये ही कामे रखडली नसती, तर जुनी सांगवीकरांवर ही वेळ आलीच नसती

जुनी सांगवी : येथील मुख्य रस्त्यांची खड्डे व चिखलामुळे दुरवस्था झाली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे रस्ते खड्डे व चिखलमय झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे.

जुनी सांगवी परिसरातील शितोळेनगर व महाराष्ट्र बँक चौक ते माहेश्वरी चौक या सिमेंटच्या रस्त्यांचे काम आधीच लॉकडाउनमुळे रखडले. त्यात सध्या या कामांना गती नाही. त्यामुळे नागरिकांना रहदारीसाठी कसरत करावी लागत आहे. काही ठिकाणी सिमेंटचा रस्ता एका बाजूने झाला असला, तरी एकेरी वाहतूक व चिखलमय रस्त्यांमुळे नागरिकांना अडचणी येत आहेत. जुनी सांगवी व परिसरात अनेक ठिकाणी खोदकामे सुरू आहेत. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

येथील बँक ऑफ महाराष्ट्र चौक ते राणा प्रताप चौक (माकन चौक) दरम्यानचा सिमेंट रस्ता आधी लॉकडाउनमुळे रखडला, तर आता त्याचे काम संथगतीने सुरू आहे. माहेश्वरी चौक परिसरात पावसात वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे काम पूर्ण होईल, तेव्हा होईल. मात्र, रहदारीसाठी या खड्डयांची तात्पुरती डागडूजी करावी, अशी मागणी नागरिकांनी स्थापत्य विभागाकडे केली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शितोळेनगर चौक-माकन चौक 
- पदपथावरील सिमेंट ब्लॉक खचले
- चेंबरची झाकणे वर 

माहेश्वरी चौक
- दुभाजकामुळे अपघातांना निमंत्रण
- रस्ता खड्डे व चिखलमय 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com