...म्हणून Work From Home करणाऱ्यांना येताहेत अडचणी

...म्हणून Work From Home करणाऱ्यांना येताहेत अडचणी

पिंपरी : गेल्या पंधरा दिवसांपासून विशालनगर, जगताप डेअरी, पिंपळे निलख भागात वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रमाण कायम आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून विशालनगर, पिंपळे निलख, जगताप डेअरी भागांत निरनिराळे कारण सांगून वेळीअवेळी वीजपुरवठा खंडित केला जात आहे. विशाल नगर येथील रहिवासी डी. एस. खरे म्हणाले, "आमच्या भागात या ना त्या कारणाने वीजपुरवठा खंडित होत आहे. रोज अर्धा ते एक तास वीज जात आहे. झाडाची फांदी तुटली, फिडर ट्रिप झाले यासारखी कारणे महावितरण कार्यालयाकडून दिली जात आहे. स्थानिक नगरसेवकदेखील कार्यालयाकडे दाद मारून थकले. आमच्या परिसरात असंख्य लोक 'वर्क फ्रॉम होम' करत आहेत. तसेच उन्हाळाही कडक आहे. त्यामुळे, सर्व नागरिक पुरते हैराण झाले आहेत. महावितरणने वीजपुरवठा सुरळीत चालू ठेवावा."

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा         

महावितरण कंपनीच्या सांगवी उपविभागाचे सहाय्यक अभियंता रत्नदीप काळे म्हणाले, "विशालनगर, पिंपळे निलख, जगताप डेअरी भागांत कोणतेही भारनियमन चालू नाही. पावसाळ्यापूर्वीच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी या भागांतील वीजपुरवठा बंद ठेवावा लागत होता. कामगार मिळणेही अशक्य झाले. त्यामुळे काम लांबले. मात्र, आतापर्यंत ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. केवळ २० टक्के काम बाकी आहे. परंतु, आता तेथील वीजपुरवठा सुरळीत चालू झाला आहे."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com