वडगाव मावळ परिसरात विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित                          

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

रविवारी (ता. 31) संध्याकाळी झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे वडगाव-नवलाख उंब्रे एमआयडीसी रस्त्यालगतचे आठ ते दहा विजेचे खांब पडल्यामुळे वडगाव (केशवनगर), कातवी, सांगवी आदी गावांसह आंदर मावळचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.

वडगाव मावळ : रविवारी (ता. 31) संध्याकाळी झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे वडगाव-नवलाख उंब्रे एमआयडीसी रस्त्यालगतचे आठ ते दहा विजेचे खांब पडल्यामुळे वडगाव (केशवनगर), कातवी, सांगवी आदी गावांसह आंदर मावळचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. महावितरणने काही भागाचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी पर्यायी व्यवस्थेचे काम हाती घेतले आहे. खांब उभारण्याचे काम सोमवारी (ता. 1) सकाळी सुरू होणार असून, संध्याकाळपर्यंत ते पूर्ण होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप                       

रविवारी संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास वडगाव-कातवी परिसरात जोरदार वादळी वारे झाले. त्यामुळे एमआयडीसी रस्त्यालगचे आठ ते दहा विजेचे खांब पडले. वीज वाहक ताराही तुटल्या. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. वडगाव येथील केशवनगर भाग, कातवी, सांगवी व आंदर मावळ भागाचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. महावितरणचे उप कार्यकारी अभियंता विजय जाधव, सहाय्यक अभियंता शाम दिवटे, वायरमन संतोष जाधव आदींनी त्वरित घटनास्थळी जाऊन खांब दुरुस्तीचे काम होईपर्यंत पर्यायी व्यवस्थेद्वारे काही भागाचा वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम हाती घेतले.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, वीजपुरवठा खंडित झाल्याने इंद्रायणी नदीवरून करण्यात आलेल्या अनेक गावच्या नळपाणी पुरवठा योजनाही बंद पडल्या आहेत. त्यामुळे पाण्याच्या साठवण टाक्या भरू न शकल्यामुळे सोमवारी दिवसभर गावांना पाण्याचा पुरवठा होऊ शकणार नाही. वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतरच पाणी पुरवठा सुरळीत होईल. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन वडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मयुर ढोरे, उपनगराध्यक्ष माया चव्हाण व  मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांनी केले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Power outage due to electricity pole collapse in vadgaon maval area