Video : टपाल खात्याला 'अच्छे दिन'

Video : टपाल खात्याला 'अच्छे दिन'

पिंपरी : कोविड-19 साठीचे पीपीई किटपासून सर्व प्रकारच्या औषधांची राज्य आणि देशभरातील काही ठिकाणी टपाल खात्यामार्फत पाठवणी चालू आहे. चिंचवड स्टेशन येथील टपाल उपकार्यालयाच्या या अत्यावश्‍यक सेवेला सर्वसामान्य नागरिकांबरोबरच काही औषधे वितरक कंपन्यांचादेखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

सध्या टपाल खात्याच्या अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद आहेत. सर्वसामान्य नागरिक आणि औषधे उत्पादक, वितरक कंपन्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून टपाल खात्याकडून ही सेवा दिली जात आहे. 

पोस्ट मास्टर रमेश कांबळे म्हणाले, "सध्या आमच्या कार्यालयाकडून सर्व प्रकारच्या औषधांची आवक-जावक चालू आहे. सर्वसामान्य नागरिकांबरोबरच विविध रुग्णालये, औषधे वितरक, उत्पादक कंपन्यांचाही आमच्या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पीपीई किट, मास्क, सॅनिटायझर यांची आवक-जावक चालू आहे. दररोज सुमारे 40 कंपन्या आणि नागरिक आमच्या सेवेचा लाभ घेत आहेत. टपाल खात्यामार्फत, ऑस्ट्रेलिया, चीन, इंडोनेशिया, जपान, दक्षिण कोरिया, फिलिपिन्स, सिंगापूर आणि श्रीलंका या दहा देशांना औषधे पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्या सेवेचाही काही कंपन्या लाभ घेत आहेत.''

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

काही रुग्णांची विशिष्ट भागांतच त्यांची औषधे उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांना औषधे पाठविण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील सदस्य, हे टपाल सेवेचा वापर करत आहेत. याशिवाय काही डॉक्‍टरांकडून देखील त्यांची औषधे रुग्णांना पाठविली जात आहेत. चिंचवड स्टेशन येथील कार्यालयामध्ये जमा झालेली औषधे पुढील वितरणासाठी पुण्यातील छाननी केंद्राला (एनएसएच) पाठविली जातात. त्यानंतर, ती पुढे संबंधित शहर, जिल्हा अथवा राज्यांना पाठविली जातात. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बेंगलोर, चेन्नई, ओडिसा येथून औषधांची आवक 

"पिंपरी-चिंचवड शहरात बेंगलोर, चेन्नई, सोलापूर, ओडिसा यासारख्या भागांमधून औषधे पाठविली जात आहेत. देश-विदेशांतील टपाल सेवेसाठी पूर्वी रेल्वे आणि विमानसेवेचा वापर केला जात होता. परंतु, आत औषधांची सर्व पार्सल गाडीने ज्या-त्या ठिकाणी पाठविली जात आहेत,'' असेही रमेश कांबळे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com