...आणि त्या गर्भवती मातेला मिळाली मायेची सावली !

Rekha-Gosavi
Rekha-Gosavi

पिंपरी - 'आठ महिन्याची गर्भवती... तिला गरज आधाराची' या मथळ्याखाली "सकाळ'मध्ये शनिवारी (ता. 23) वृत्त छापून आले आणि तिच्यासाठी सामाजिक संस्था, कार्यकर्ते धावून आले. अनेकांनी तिला महिनाभर पुरेल इतका धान्यसाठा दिला. आर्थिक मदतही केली, पण तिला खरी गरज होती आपल्या माणसांची. तिची ही अवस्था पाहून महापालिका अधिकारी, पोलिसांनी मध्यस्थी केल्यावर सख्ख्या भावाने रेखा गोसावी यांना आधार अन्‌ निवारा दिला. तिला मायेची सावली मिळाल्यामुळे सर्वांचेच चेहरे आनंदले होते.

रेखा यांचे दोन विवाह झाले होते, पण अयशस्वी. पतीने सांभाळण्यास नकार दिल्याने त्या सध्या चार मुलांसह वेगळ्या राहायच्या. भावाने पण स्वीकारण्यास नकार दिल्याने ती निराधार झाली. अशाच परिस्थितीत ती आकुर्डी - विठ्ठल मंदिर परिसरात बेवारस स्थितीत फिरू लागली. निगडी पोलिसांनी लॉकडाउनमध्ये तिला मुलांसह आकुर्डीतील उर्दू माध्यमिक शाळा निवारा केंद्रात आणून ठेवले. दीड महिन्यात खाण्याची, राहण्याची सोय झाली होती. पण आता परप्रांतीय, परजिल्ह्यातील नागरिकांचा परतीचा मार्ग मोकळा झाल्याने अनेकजण परतल्याने निवारा केंद्र बंद होण्याच्या मार्गावर होते. त्यामुळे तिची सोय करणे गरजेचे होते. त्यासंबंधी सकाळमध्ये वृत्त प्रसिद्ध झाले. त्याची दखल घेत तिला पिंपळे सौदागरमधील सामाजिक कार्यकर्ते संतोष हांडे, काशिनाथ नखाते यांनी मदत केली. चार महिन्याचे धान्य दिले. पण सख्ख्यांनीच पाठ फिरवली होती.

अशावेळी आकुर्डी उर्दू शाळा निवासी केंद्राचे व्यवस्थापक राजू मानकर यांनी त्या महिलेचे बंधू बाळू गोसावी (रा. मु.पो.खोडद ता.जुन्नर ) यांच्याशी संपर्क करून तिला मायेची सावली देण्याची विनवणी केली. खोडद गावाचे सरपंच विश्‍वास काळे यांच्याशी चर्चा केली. निगडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक डी. बी. पथकाचे लक्ष्मण सोनवणे, विकास दुधे,महेश बहिरट, पोलिस कॉन्स्टेबल कृतज्ञ आनंद चव्हाण, शुभम राजू खिलारे सगळ्यांनी सरपंच यांच्या समक्ष रेखा यांना बंधूकडे सोपवले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com