पिंपरी-चिंचवड : राष्ट्रवादी कॉंग्रेस व्यापारी सेलचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड यांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 September 2020

महिन्याभरात दोन भावांचे निधन झाले आहे. त्यामुळे गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे व्यापारी सेलचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड (वय 58) यांचे शुक्रवारी (ता. 26) निधन झाले आहे. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुले, असा परिवार आहे. राष्ट्रवादीचे शहरातील एक अत्यंत कार्यक्षम व धाडसी कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती. 

पिंपरी-चिंचवड शहरात आज 49 जणांचा मृत्यू

पंधरा दिवसांपूर्वी प्रदीप गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज दुपारी बाराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. पक्षातील विविध उपक्रम राबविण्याची, तसेच संघटनात्मक बांधणीची जबाबदारी त्यांच्याकडे होती. पक्षाच्या कार्यात ते नेहमी अग्रेसर असत. त्यांचा मोरवाडीत लोखंडी फर्निचर बनविण्याचा उद्योग होता. तिथेच ते वास्तव्यास होते. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

महिन्यापूर्वीच त्यांचे थोरले बंधू आणि अंध विद्यार्थ्यांचा आश्रम चालविणारे अप्पा गायकवाड यांचेही कोरोनामुळे निधन झाले. महिन्याभरात दोन भावांचे निधन झाले आहे. त्यामुळे गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: President of NCP Merchant Cell Pradip Gaikwad passed away in pimpri chinchwad