Shekhar Singh : २५ कोटींची उधळपट्टी थांबविण्यासाठी स्वाक्षरी मोहीम

डांगे चौक, थेरगाव : आंदोलन अन घोषणाबाजी
protested at Dange Chowk against Municipal Commissioner Shekhar Singh 25 crores fraud
protested at Dange Chowk against Municipal Commissioner Shekhar Singh 25 crores fraudsakal

वाकड : डांगे चौक ते बिर्ला हॉस्पिटल या रस्त्यावर अर्बन स्ट्रीटच्या कामाच्या नावाखाली सुमारे २५ कोटींच्या उधळपट्टीला महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी प्रशासकीय मान्यता दिल्याच्या विरोधात थेरगाव परिसरातील नागरिकांनी डांगे चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर रविवारी (ता. २५) स्वाक्षरी अभियान राबवून अनोखे आंदोलन केले.

माजी नगरसेविका माया बारणे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या आंदोलनात माजी विरोधी पक्ष नेते संतोष बारणे, माजी नगरसेवक सतीश दरेकर, कैलास बारणे, गोरक्षनाथ पाषाणकर, प्रशांत सपकाळ, सचिन बारणे, अनिल बोरकर यांच्यासह थेरगाव परिसरातील व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आयुक्त साहेब लूट थांबवा, लूट थांबवा जनतेच्या पैशांची लूट थांबवा!, थेरगाव वासीयांच्या मागणीकडे लक्ष दया!, नको ते अर्बन स्ट्रीट-नको ती वाहतूक कोंडी!, जनतेचे हित जपत अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटिकरण करा अशी घोषणाबाजी करण्यात आली.

डांगे चौक-बिर्ला हॉस्पिटल रस्ता ३४ मीटर आहे. जर हा रस्ता अर्बन स्ट्रीटनुसार विकसित झाला तर रस्त्याची रुंदी कमी होऊन वाहतुकीची समस्या निर्माण होणार आहे. २०२०-२१ मध्ये या रस्त्यावर ६५ लाख रुपये खर्चून फूटपाथचे काम झाले असून सध्या फुटपाथ सुस्थितीत आहेत. असे असताना देखील अंदाज पत्रकामध्ये दहा कोटींची मान्यता असून सुद्धा २५ कोटींच्या खर्चाची मान्यता आयुक्तांनी दिल्याचे निवेदनात म्हटले आहे. सायंकाळी आयुक्त शेखर सिंह यांना स्वाक्षरी मोहिमेचा व मागण्याचे निवेदन मेलवर पाठवून आंदोलन थांबविण्यात आले.

घरे गेली खाली अन रस्ते झाले वरती

थेरगावातील अनेक रस्त्यांवर वारंवार डांबरीकरण झाल्याने रस्ते उंच झालेत त्यामुळे नागरिकांची घरे खाली गेले आहेत. पावसाळ्यात नागरिकांच्या घरांत पाणी जाते त्यामुळे आयुक्त साहेबांना आमची विनंती आहे की, जो २५ कोटींचा खर्च करून उधळपट्टी होणार आहे त्याऐवजी थेरगाव परिसरातील ज्या ठिकाणी रस्ते उंच झालेत त्या ठिकाणी योग्य उपाय योजना करून काँक्रिटीकरण करावे.

रस्त्यावर असंख्य गृह प्रकल्प अन वर्दळ

या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ आहे. त्याचप्रमाणे चैतन्य विहार, गृह संकल्प, ग्रीन्स, पदमजी पेपर मिल्स, थेरगाव फाट्यावरील कासा सेवन, गृह संकल्प, व्यंकटेश्वरा, रॉयल कोर्ट, अभिजीत पार्क, रॉयल कॅसल, आनंद पार्क, श्रीकृष्ण कॉलनी, क्रांतिवीर नगर येथील यशोदा अंगण, शांताई पार्क, एस ओरा, अतुल्य रचना, साई आयकॉन, ब्ल्यू रिच, वर्धमान वाटिका, ग्रँड कासल, साई आंगन असे मोठाले गृह प्रकल्प असून गणेश नगर परिसरातील नागरिकांच्या वाहनांची वर्दळ देखील मोठ्या प्रमाणात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com