
Pune Crime News: मावळातील चांदखेडमधील यात्रेत गोळीबार
पिंपरी : चांदखेड येथे यात्रेत दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हवेत गोळीबार करणाऱ्या आरोपीना शिरगाव पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून त्यामध्ये आरोपी भरदिवसा गोळीबार करताना दिसत आहेत.
अविनाश बाळासाहेब गोठे (वय. २२ रा. चांदखेड), विजय अशोक खंडागळे (वय. १८, रा. चांदखेड), मनिष शिवचरण यादव (वय.२० रा.चांदखेड), अमर उत्तम शिंदे (वय.२२, रा.परंदवडी, ता. मावळ), अनिकेत अनित पवार (वय २६, रा. थेरगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
चांदखेड येथे ग्रामदैवताची यात्रा सुरू असताना गावात दहशत पसरवण्याच्या उद्देशाने टोळक्याने राडा घातला.
गाड्यांच्या काचा फोडून फ्लेक्स फाडले. तमाशाचा तंबूत जाऊन तेथील लोखंडी पेट्यांवर कोयत्याने मारले.
आरोपी अविनाश याने लोकांच्या दिशेने पिस्तुलातून गोळीबार करून दहशत निर्माण केली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून त्यामध्ये आरोपी भरदिवसा पिस्तुलातून गोळीबार करताना दिसत आहे. या घटनेमुळे नागरिक दहशतीखाली आहेत.