‘मिसिंग लिंक’'च ठरणार प्राणदायिनी 

Pune-Mumbai Expressway Borghata Accident Road Development Corporation completion of Missing Links project
Pune-Mumbai Expressway Borghata Accident Road Development Corporation completion of Missing Links project

पिंपरी : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बोरघाटातील उतारांबाबत असलेल्या भौगोलिक बाबींच्या मर्यादांमुळे सर्वतोपरी उपाय करूनही अपघात रोखणे शक्य होत नाही. त्यामुळे बोरघाटातील अपघातांची शृंखला ठोसपणे कमी होण्यासाठी रस्ते विकास महामंडळाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी डिसेंबर २०२२ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

- प्रकल्पाबाबत
- खालापूर ते कुसगाव प्रकल्पाची लांबी ः १९.८० किलोमीटर
- खालापूर ते खोपोली ८ पदरीकरण ः ५.८६ किलोमीटर
- खोपोली एक्झिट ते कुसगाव (सिंहगड संस्था) दोन पूल आणि व्हायाडक्ट ः १३.३ किलोमीटर

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

असे असतील बोगदे
- बोगदा नंबर १ ः १.७५ किलोमीटर लांबीचे दोन समांतर बोगदे
- बोगदा नंबर २ ः ८.९२ किलोमीटर लांबीचे दोन समांतर बोगदे
- बोगद्यांची रुंदी ः २१.४५ मीटर
- मुंबई व पुण्याकडे जाणारे दोन्ही बोगदे दर ३०० मीटरला एकमेकांना जोडले जाणार

असे असतील व्हायाडक्ट पूल- व्हायाडक्ट क्र. १ ः ९०० मीटर लांबीचे दोन समांतर पूल
- व्हायाडक्ट क्र. २ ः ६५० मीटर लांबीचे दोन समांतर केबल स्ट्रे पूल
 

पुण्यात दुचाकी चोरट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; ८ वाहने जप्त 

असे सुरू आहे मार्गाचे काम
- बोगदा क्र. २ च्या एक्झिटच्या समांतर बोगद्यांपैकी उजव्या बोगद्याचे २०५७ मीटर (मुंबईकडे) खोदकाम पूर्ण झाले असून, डाव्या बोगद्याचे १७१४ मीटर (पुण्याकडे) खोदकाम पूर्ण
- बोगदा क्र. २ ला जोडणाऱ्या ॲडिट क्र. १ (जोड बोगदा)चे १६३० मीटर खोदकाम पूर्ण, ॲडिट क्र. २ चे खोदकाम पूर्ण झाले असून, ॲडिट क्र. ३ चे काम १७ मीटर खोदकाम पूर्ण झाले आहे.
- मुंबई व पुणे या दरम्यान दोन्ही समांतर बोगद्यांना जोडणाऱ्या ३२ पैकी ७ क्रॉसिंग पॅसेजचे काम पूर्ण
- बोगदा क्र. १ च्या नियोजित प्रवेशद्वाराच्या ठिकाणापर्यंत पोचण्याचे काम सध्या प्रगतिपथावर
- सध्याच्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खालापूर टोलनाका ते खोपोली एक्झिट ८ पदरीकरणाचे काम प्रगतिपथावर
- आठ पदरीकरणातंर्गत तिन्ही पुलाचे काम प्रगतिपथावर
- व्हायाडक्ट क्र. १ च्या पायाभरणीचे व खांब बांधणीचे काम प्रगतिपथावर
- व्हायाडक्ट क्र. २ च्या आखणीपर्यंत पोचण्यासाठी बांधकाम करण्याचे काम सुरू

एक साखरपुडा, तीन ठिकाणं आणि इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड

नियम मोडणाऱ्यांवर नजर
द्रुतगती मार्गावर नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी अत्याधुनिक हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम कार्यान्वित करण्यात येणार आहे. यामध्ये द्रुतगतीच्या दोन्ही बाजूला २०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, हे कॅमेरे सुमारे दर चार किलोमीटर अंतरावर असणार आहेत. त्यातून ओव्हरस्पीड, लेन कटिंग, सीट बेल्ट न लावणे या सारख्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.

‘‘बोरघाटात होणाऱ्या अपघातामुळे मिसिंग लिंक प्रकल्प राबविण्यात येत असून, कोरोनाच्या काळात त्याचे काम काही प्रमाणात रखडले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कामाला वेग आला आहे. या मार्गामुळे बोरघाटातील वाहतुकीला मोठा पर्याय उपलब्ध होत असून, त्यातून वाहतूक कोंडी कमी होण्यास तसेच, अवजड वाहनांसाठी सुकर मार्ग या निमित्ताने मिळणार आहे. या मार्गामुळे वाहनचालकांना वेगळा मूळ मार्ग आणि मिसिंग लिंक असे दोन पर्याय मिळणार आहेत.
- राकेश सोनवणे, कार्यकारी अभियंता, रस्ते विकास महामंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com