पिंपरीत सेक्स ऑनलाईन रॅकेटचा पर्दाफाश; तीन महिलांची मुक्तता

पिंपरीत सेक्स ऑनलाईन रॅकेटचा पर्दाफाश; तीन महिलांची मुक्तता

पिंपरी: पिंपरी चिंचवडमधील एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. हे सेक्स रॅकेट ऑनलाईन पद्धतीने चालवलं जात होतं. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सोशल सिक्यूरीटी सेलने ही कारवाई केली आहे. ऑनलाईन सेक्स रॅकेट (sex racket) चालवण्याच्या या प्रकाराबद्ददल पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pimpri Chinchwad police)

पिंपरीत सेक्स ऑनलाईन रॅकेटचा पर्दाफाश; तीन महिलांची मुक्तता
बिग बॉसमधल्या अभिनेत्रीनं धर्मासाठी सोडलं बॉलीवूड, हिजाबचं समर्थन

वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये महिलांच्या नावावर काही खोल्या बुक करण्यात आल्या होत्या, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या तीन महिलांना रेस्क्यू होममध्ये पाठवलं आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी याबाबतची एक टीप मिळाली होती. पिंपरी-चिंचवडमधील वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये सेक्स रॅकेट चालवलं जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ही कारवाई केली आहे. यातील आरोपी ग्राहकांना महिलांचे फोटो ऑनलाईन माध्यमातून पाठवत होता आणि त्यांच्यासाठी ऑनलाईन पद्धतीनेच हॉटेल्स बुक करत होता.

पिंपरीत सेक्स ऑनलाईन रॅकेटचा पर्दाफाश; तीन महिलांची मुक्तता
रोहित पवारांकडून मिसळची तुलना पुरणपोळीशी; फडणवीसांना लगावला टोला

याबाबत अधिकचा तपास केल्यानंतर पोलिस एका फसवणूक झालेल्या ग्राहकाच्या संपर्कात आले. त्याच्या माध्यमातून त्यांनी हे रॅकेट चालवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला. त्यानंतर त्याला चिंचवडमधील एका हॉटेलमध्ये बोलावून घेण्यात आलं. या ग्राहकाने पोलिसांनी माहिती दिल्याबरोबर पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला आणि या रॅकेटमधील तीन महिलांना मुक्त केलं. मिळालेल्या माहितीनुसार, या रॅकेटमधील तीन महिला या महाराष्ट्रबाहेरच्या असून त्यांना जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलण्यात आलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com