पिंपरी महापालिकेच्या जीबीमध्ये 'वायसीएम'च्या डाॅक्टर भरतीवरून आरोप-प्रत्यारोप

पिंपरी महापालिकेच्या जीबीमध्ये 'वायसीएम'च्या डाॅक्टर भरतीवरून आरोप-प्रत्यारोप

पिंपरी : महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) पदव्यूत्तर पदवी (पीजी इन्स्टिट्यूट) विभागातील प्राध्यापक भरतीवर महापालिका सर्वसाधारण सभेत प्रश्र्न चिन्ह उपस्थित करण्यात आले. नियुक्त केलेले डाॅक्टर खाजगी प्रॅक्टीस करतात, वयोमर्यादा संपलेल्या डाॅक्टरांची भरती केली व पात्र डाॅक्टरांना डावलण्यात आले, असे आरोप करण्यात आले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिका सर्वसाधारण सभा बुधवारी झाली. पस्तीस नगरसेवक प्रत्यक्ष उपस्थित होते. तर, अन्य सदस्य आॅनलाइन पद्धतीने सहभागी झाले. वायसीएमच्या पीजी इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापकांची पदे भरण्यात आली. या प्रक्रियेत पात्र डाॅक्टरांना डावलण्यात आल्याने एक उमेदवाराने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे योगेश बहल यांनी लक्ष वेधले. त्यापूर्वी त्यांनी, 'गद्दार गद्दार,' म्हणत सभागृहात प्रवेश केला. त्याचा एकनाथ पवार यांनी निषेध केला. गेल्या दहा वर्षांत झालेल्या भरती प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. 

वायसीएम भरती विषयावरील चर्चेत अजित गव्हाणे, राहूल कलाटे, बाळासाहेब ओव्हाळ, आशा शेंडगे, सीमा सावळे, अभिषेक बारणे, मंगला कदम आदींनी सहभाग घेतला. महापौर उषा ढोरे पीठासन अधिकारी होत्या. प्रशासनाच्या वतीने आयुक्त श्रावण हर्डीकर व सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर यांनी भूमिका मांडली. वायसीएम पीजी इन्स्टिट्यूटसाठी 74 प्राध्यापक पदे भरण्यात आली. त्यात सध्या वायसीएम सेवेत कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत, त्या 55 पैकी 32 जणांची निवड केली आहे, असे लोणकर यांनी सांगितले. 

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले....
राज्य सरकारच्या जाहिरातीतील अटी व शर्तीच आपण वायसीएमच्या डाॅक्टर अर्थात प्राध्यापक भरतीसाठीच्या जाहिरातीत वापरल्या. एखादी पदासाठी संबंधित उमेदवार उपलब्ध न झाल्यास निवड समिती अटी शिथिल करू शकते.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com