आंदर मावळातील रेल्वेफाटक बंद; 50 गावांतील नागरिकांना घालवा लागतोय वळसा 

आंदर मावळातील रेल्वेफाटक बंद; 50 गावांतील नागरिकांना घालवा लागतोय वळसा 

कामशेत (ता. मावळ) : मी कान्हेतील कंपनीतून मटेरियल घेऊन चाकण रोज जात असतो. आजही दररोजप्रमाणे निघालो. रेल्वे फाटकावर आलो तर दुरुस्तीसाठी रेल्वे फाटक बंद म्हणून पुन्हा माघारी फिरून जांभूळगाव मार्गे चाकणला गेलो. येथील रेल्वे फाटक दुरुस्तीसाठी वारंवार बंद असते. दुरुस्तीच्या कामाला आमची हरकत नाही, पण किमान रेल्वे फाटक दुरुस्तीसाठी बंद असल्याच्या सूचना टाकवे बुद्रूक वरून येणाऱ्या जांभूळगाव फाट्यावर आणि महामार्गाजवळील कान्हे फाट्यावर सूचना फलक लावण्याची तसदी रेल्वे प्रशासनाने घेतली असती तर माझ्यासारख्या शेकडो वाहनचालकांना, प्रवाशांना रेल्वे फाटकापर्यत पोहोचून पुन्हा माघारी फिरुन येण्याचे कष्ट घ्यावे लागले नसते. येथील रेल्वे फाटकावर दुरूस्तीचे काम वारंवार होते. यासाठी दिवसभर रेल्वे फाटक बंद ठेवले जाते. माझ्यासारख्या कित्येकांना याची पुसटशी कल्पना नसते. परिमाणी येथे पोहोचून मनस्ताप सहन करावा लागतो. वेळ जातो याचे भान रेल्वे प्रशासनाला होवो, अशी अपेक्षा टेंपोचालक शंकर कुढले या ड्रायव्हरने केली. 

या रेल्वे फाटकापर्यत पोहोचून पुन्हा माघारी फिरणारा शंकर हा एकटाच वाहन चालक नाही. त्यांच्यासारखे शेकडो वाहन चालक, कित्येक दुचाकीस्वार येथे फिरून माघारी आले, नाही त्यांनी जांभूळगाव मार्गे जाणे पसंत केले. कित्येक दुचाकीस्वार कान्हेतील रेल्वे फाटकाजवळच्या मोरी खालून गेले. या मोरीत खूपच दुषित पाणी साठले आहे. त्या पाण्यातून दुर्गंधी येते. त्याकडे दुर्लक्ष करीत दुचाकीस्वार यातून जाताना रेल्वे अधिक-यांना शिव्याशाप देतच जात आहे. बबन बांगर, सुभाष ठाकर, सोमनाथ भोसले, पप्पू काटकर, रोहीत काटकर यांनीही रेल्वे प्रशासनाने फाटक बंद करून काम सुरू करण्यापूर्वी जांभूळगाव फाटा व महामार्ग जवळ कान्हे फाटा येथे सूचना फलक लावणे आवश्यक असल्याची अपेक्षा व्यक्त केली.

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 
रेल्वे फाटक दिवसभरासाठी बंद असल्याने आंदर मावळात जाणाऱ्या पन्नास गावांतील नागरिकांनाही वळसा घालून जावे लागले. शाळा महाविद्यालयात आलेले विद्यार्थी, कामशेतला बाजारासाठी गेलेले नागरिक, रुग्ण पायपीट करीत महिंद्रा कंपनी पर्यतचा सुमारे दोन किलोमीटर चालत आलो असल्याचे कित्येकांनी सांगितले. रेल्वे फाटकावर काम करीत असलेले रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला म्हणाले, ‘‘हम यहाँ के इनचार्ज नही, यहाँ अलग साहब काम करते है, आप उनसे बात करो.’’ स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. नंतर फोन उचलणे ही टाळले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com