Traffic Jam : वाहतूक पोलिसांचे प्रायोगिक तत्व, स्थानिक अन आयटीयन्सचे सत्व

भूमकर चौक फ्री, मात्र विनोदे नगर लक्ष्मी चौक जाम
 rain forecast Massive Traffic Jam At Bhumkar Chowk In Wakad
rain forecast Massive Traffic Jam At Bhumkar Chowk In Wakad sakal
वाकड : आयटी नगरी हिंजवडीकडे जाणाऱ्या रस्त्यातील वाहतूक कोंडीची समस्या दूर व्हावी म्हणून वाकड वाहतूक पोलिसांनी दोन दिवसांपासून प्रायोगिक तत्त्वावर भूमकर नगर, विनोदे नगर, विनोदे चौक, लक्ष्मी चौक या मार्गात एकेरी वाहतूक सुरू केली आहे. या प्रयोगामुळे भूमकर चौकाने बऱ्यापैकी मोकळा श्वास घेतला मात्र कस्तुरी चौक, विनोदे नगर चौक अन लक्ष्मी चौक रस्त्यावर वाहनांच्या मोठाल्या रांगा लागत आहेत.

एवढेच नव्हे तर स्थानिक रहिवाशांना शंभर मीटर अंतरावरील घरी जाण्यासाठी तब्बल दोन ते तीन किमीचा वळसा मारून आपल्या घरी जावे लागत असल्याने स्थानिक रहिवाशी प्रचंड नाराज झाले असून वाहतूक पोलिसांचे प्रायोगिक तत्व अन रहिवाशांचे सत्व अशी चर्चा वाकड-हिंजवडी परिसरात जोरावर आहे. रहिवाशांनी अन्य काही तोडगा काढून या वाहतुक कोंडीतून मुक्तता करावी अशी विनंती केली आहे.

वाहतूक कोंडीतून सर्वांचीच मुक्तता करण्यासाठी वरिष्ठांच्या सूचनेनुसार प्रायोगिक तत्वावर प्रयोग सुरू आहेत या प्रयोगांचे फायदे तोटे याचे सर्वेक्षण करून पुन्हा जनहीताचे योग्य ते बदल केले जातील कृपया सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती

- सुनील पिंजन वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाकड वाहतूक विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com