पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभर पावसाचा जोर कायम

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 29 August 2020

पिंपरी शहरात परिसरात शनिवारी (ता. 29) सकाळपासूनच हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या. दिवसभर संततधार सुरू असल्यामुळे अनेकांना फिरण्यासाठी, खरेदीसाठी बाहेर पडताच न आल्याने "विकेंड' वाया गेला. 

पिंपरी - शहरात परिसरात शनिवारी (ता. 29) सकाळपासूनच हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या. दिवसभर संततधार सुरू असल्यामुळे अनेकांना फिरण्यासाठी, खरेदीसाठी बाहेर पडताच न आल्याने "विकेंड' वाया गेला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या काही दिवसापासून शहरात ढगाळ वातावरण आहे. अधूनमधून पावसाची संततधार सुरूच आहे. आज मात्र सकाळपासून पावसाने हजेरी लावल्याने नोकरदार महिला व कर्मचाऱ्यांची त्रेधा उडाली. पिंपरी, चिंचवड, पिंपळे गुरव, भोसरी, चिखली, जाधववाडी, कुदळवाडी, निगडी, कासारवाडी, फुगेवाडी भागांतही पाऊस पडला. रिमझिम स्वरूपाचा पाऊस असल्याने दुचाकी चालकांना त्यांचे रेनकोट, रेनसुट बाहेर काढावे लागले. दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्याने शहरवासीयांना आज "सूर्यदर्शन'च घडले नाही. यावर्षी पावसाने वेळीच हजेरी लावल्याने शहरवासीय सुखावले आहेत.

पिंपरी-मोरवाडी कोर्टाचे तत्काळ स्थलांतर करा; उपमुख्यमंत्र्यांचे आयुक्तांना आदेश 

सतर्कतेचा इशारा 
मावळ तालुक्‍यासह पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागविणाऱ्या पवना धरण परिसरात संततधार पाऊस सुरूच असून धरणात 95 टक्के पाणीसाठा झाला आहे. दरम्यान, पावसाळा सुरू झाल्यानंतर सुरवातीचे दोन महिने पावसाने ओढ दिल्याने मावळातील धरणे भरतील का नाही? अशी शंका होती.

...म्हणून एक सप्टेंबरपासून रेशनिंग दुकानदारांचा संप

पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास धरण लवकरच शंभर टक्के भरणार असून धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे नदी पात्रालगत असलेल्या गावांनी खबरदारी घ्यावी. सर्व नागरिकांनी सतर्क राहावे. नदी तीरावरील सर्व साधनसामग्री, वाहने व जनावरे सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. जेणेकरून कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही याची काळजी घेण्यात यावी व जलसंपदा विभागास सहकार्य करावे, असे आवाहन जलसंपदा व पाटबंधारे विभागाने केले आहे. 

अनाथआश्रमात विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या कलाकृतीमधून साकारलीय गणपती बाप्पांची आरास

मुळशी धरण 
मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढले असून धरण पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे दुपारपर्यंत विसर्गात वाढ करून 6500 क्‍युसेक्‍स वरून 10500 क्‍युसेक्‍स करण्यात येईल याची कृपया नोंद घेण्यात यावी. पर्ज्यन्यमानानुसार त्यामध्ये वाढ होईल, असे धरणप्रमुख बसवराज मुन्नोळी यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rain in pimpri chinchwad