
एका ट्रान्स्पोर्ट कंपनीच्या नावाचा वापर करून घरसामान शिफ्ट करण्याच्या नावाखाली खंडणी उकळणाऱ्याला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने जेरबंद केले. आरोपीकडून एक लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पिंपरी - एका ट्रान्स्पोर्ट कंपनीच्या नावाचा वापर करून घरसामान शिफ्ट करण्याच्या नावाखाली खंडणी उकळणाऱ्याला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने जेरबंद केले. आरोपीकडून एक लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत दिली.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
वीरेंद्रकुमार रामकिसन पुनिया (वय 25, रा. ट्रान्सपोर्टनगरी, निगडी, मूळ-राजस्थान) असे आरोपीचे नाव आहे. व्हीआरएल कार्गो या ट्रान्स्पोर्ट कंपनीच्या नावाचा गैरवापर करून निगडी येथे व्हीआरएल कार्गो इंडिया पॅकर्स ही बनावट कंपनी स्थापन केल्याचे तो सांगायचा. दरम्यान, कोथरूड येथील राजेश नायक यांना त्यांचे घरसामान मॅंगलोर येथे पोहोच करायचे होते, त्यासाठी त्यांनी www.vricargoindiapacker.in या संकेतस्थळावरून मिळालेल्या नंबरवर वीरेंद्रकुमार याचे खोटे नाव असलेल्या सोनू चौधरी नावावर संपर्क साधला. मॅंगलोर येथे जाण्यासाठी अकरा हजारांचे भाडे ठरविले. नायक यांनी आठ हजार ऍडव्हान्स दिले. मात्र, काही कालावधीनंतर नायक यांना फोन करून सामान हवे असल्यास नऊ हजार रुपये खंडणी स्वरूपात मागितली. तसेच, घरसामानही मॅंगलोर येथे पोहोच केले नाही.
नात्याला काळीमा फासणारी घटना! काकाच्या लैंगिक छळाला कंटाळून पुतणीची आत्महत्या
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नायक यांच्यावतीने त्यांचे मित्र आशिष गावडे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात निगडीत अशी कोणतीही कंपनी नसल्याचे निष्पन्न झाले. VRL CARGO या नामांकित कंपनीच्या नावाचा गैरवापर करून आरोपीने फसवणूक करून खंडणी उकळली असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन व फेसबुकच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेतला असता, तो निगडीतील ट्रान्सपोर्टनगर येथे सापडला. त्यानंतर निगडीच्या गोडाऊनमध्ये ठेवलेले घरसामान, दुचाकी, एक मोबाईल, असा एकूण एक लाख 60 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीला 14 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
लोणावळ्यात पर्यटकांची विकेंडला वाढली गर्दी
खोट्या नावांचा वापर
वीरेंद्रकुमार हा सोनू चौधरी, सोनू कुमार, विक्रम सिंग अशा वेगवेगळ्या नावांचा व मोबाईल क्रमांकाचा वापर करायचा. यासह व्हीआरएल कार्गो इंडिया पॅकर्स या नावाची खोटी कंपनी व वेबसाइट तयार केली असून, ही कंपनी कुठेही रजिस्टर नसल्याचे समोर आले आहे.
Edited By - Prashant Patil