रावेतमधील बांधकाम मजुरांच्या मुलांसाठी सहगामी फाउंडेशनचा पुढाकार

रावेत येथे बांधकाम मजुरांच्या मुलांसाठी सहगामी फाउंडेशन संचलित ‘मस्ती की पाठशाळा’ भरते. शाळेत जाऊन शिकून नोकरी केली, तर पैसे मिळतील याचे त्यांना खूप कौतुक वाटतं नाही.
Masti ki Pathshala Student
Masti ki Pathshala StudentSakal

पिंपरी - झोपडपट्टीत (Slum) राहून भंगार गोळा करणाऱ्या मुलांची (Child) मानसिकताच वेगळी असते. त्यांना दोनवेळच्या जेवणाची (Food) भ्रांत असते. त्यामुळे ही मुले भंगार विकून पैसे (Money) कमावतात. त्यांना शिक्षणाचे (Education) अप्रूप नसते... अशाच मुलांसाठी ‘मस्ती की पाठशाळा’ भरते. पोटभर अन्न, स्वच्छ कपडे, चांगले शिक्षण (Education) आणि थोडसे प्रेम मिळाल्यावर शिक्षणाची कशी किमया घडू शकते, याचा प्रत्यय महापालिकेच्या शाळेत प्रवेश घेतलेल्या १६ शालाबाह्य मुलांकडे पाहून येतो. सध्या या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणल्याचे समाधानकारक चित्र पाहायला मिळत आहे. (Ravet Construction Worker Child Education Sahgami Foundation Initiative)

रावेत येथे बांधकाम मजुरांच्या मुलांसाठी सहगामी फाउंडेशन संचलित ‘मस्ती की पाठशाळा’ भरते. शाळेत जाऊन शिकून नोकरी केली, तर पैसे मिळतील याचे त्यांना खूप कौतुक वाटतं नाही. आताच सहजपणे कमी कष्टात पैसा मिळत असताना त्यांना भविष्याचीही चिंता वाटत नाही, हे खूपच साहजिक आहे. पाठशाळेने अशा परिस्थितीतील ३०हून अधिक मुलांना अभ्यासाची गोडी लावून त्यांच्यात बदल घडवला. जी मुले भंगार गोळा करून आपला उदरनिर्वाह करत होते. आता ते शाळेत जात आहेत, भंगारात सापडलेले रद्दी पुस्तक न विकता ती वाचण्याचा प्रयत्न करत आहेत, स्वतःहून शाळेत तर जात आहेतच; पण सभोवतालच्या शालाबाह्य मुलांनाही सोबत घेऊन जात आहेत. रोज या मुलांना अभ्यासासोबत मुल्यशिक्षणही शिकवले जाते.

Masti ki Pathshala Student
औषध दुकानदारांकडून शासनाच्या अध्यादेशालाच केराची टोपली

गेल्‍यावर्षी वस्तीतील १० मुलांना जवळच्या महापालिका शाळेत प्रवेश मिळवून दिला. आम्हाला मोठ्या शाळेत जायचे आहे, यासाठी स्वत:हून मुलांनी हट्ट केला. या शालाबाह्य विद्यार्थ्यांना वयानुसार पाचवी ते आठवीच्या वर्गात प्रवेश देण्यात आला. पण, १४ महिन्यांपासून कोरोनामुळे संकट उभे राहिले. तेव्हा खासगी शाळांप्रमाणे महापालिका शाळांनीही ऑनलाइन अभ्यासक्रम दिला. त्यावेळी पाठशाळेतील केतकी नायडू, गीता लेले, पूर्वा मयूर, सचिन श्रीवास्तव यांनी मुलांचा ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्ण केला. आता मुले उत्तमरीतीने उत्तीर्ण होऊन वरच्या वर्गात गेली आहेत. यावर्षी रावेत शाळा क्रमांक ९७ मध्ये १६ मुलांनी प्रवेश घेतला आहे. यासाठी मुख्याधापक साहेबराव सुपे, शिक्षिका रूपाली कड व गीता खोपे यांचे सहकार्य मिळाले. त्यांनी पाठशाळेत येऊन मुलांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली.

‘गेल्यावर्षी शाळेत प्रवेश मिळवून दिलेली मुले उत्तीर्ण होऊन पुढील इयत्तेत गेली आहेतच, पण त्याचबरोबर पुढील वर्षाचा प्रवेश घेण्यासाठी रावेत शाळेतील शिक्षक स्वतः पाठशाळेत येऊन गेले. पुढील वर्षासाठी १८ नवीन मुलांचा प्रवेश झाला आहे. या शाळांनी अशाप्रकारे ग्राउंड लेव्हलवर जाऊन काम केले, तर साक्षरतेचे प्रमाण नक्कीच वाढत जाईल. ’’

- प्राजक्ता रुद्रवार, अध्यक्षा, सहगामी फाउंडेशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com