Sun, May 28, 2023

Crime News : पिंपरी-चिंचवड हादरलं! चाळे करणाऱ्या प्रेमी युगलाला हटकल्याने रिक्षाचालकाचा खून
Published on : 19 March 2023, 2:25 pm
पिंपरी चिंचवड : रस्त्यावर पार्क केलेल्या ऑटो रिक्षा रिक्षामध्ये चाळे करणाऱ्या प्रेमी युगलाला हटकल्यामुळे पिंपळे गुरव मधील एका रिक्षा चालकाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकरा समोर आला आहे. दापोडीतील गणेश नगर भागामध्ये हा प्रकार घडला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
आज संध्याकाळी साडेपाच वाजता दरम्यान दापोडीतील गणेश नगर परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला. खून झालेसल्या रिक्षाचालकाचं नाव अलीम इस्माईल शेख (वय 45) असे असून अलीम इस्माईल शेख खून प्रकरणात दोन आरोपींना भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.