...अन् रिक्षाचालकानेच थाटला गणेशमूर्तींचा स्टॉल

...अन् रिक्षाचालकानेच थाटला गणेशमूर्तींचा स्टॉल

जुनी सांगवी : कोरोनामुळे यंदा सर्वच सण-उत्सव साजरे करण्यावर निर्बंध आले आहेत. त्यात सर्वांच्या जिव्हाळ्याचा उत्सव म्हणजे गणेशोत्सव. त्याची तयारी महिन्याआधीच सुरू होते. मूर्तिकारांपासून विक्रेत्यांपर्यंत लगबग सुरू असायची. गणेश मंडळांच्या मंडप उभारणी ते ढोल ताशांच्या सरावाचा निनाद या काळात सुरू असायचा. तसेच, सजावटीसाठी शोभेच्या वस्तू, मखर, पूजा साहित्य, विद्युत दिवे आदींनी बाजारपेठा गजबजलेल्या असायच्या. मात्र, या सगळ्यांवर यंदा कोरोनाचा मोठा परिणाम झाला आहे. 

कोरोनामुळे केलेल्या लॉकडाउनमुळे उद्योगधंदे व व्यवसाय बंद होते. आता ते सुरू झाले असले, तरी आर्थिक गणिते अद्याप गतिमान झालेली नाहीत. आर्थिक ओढाताणीमुळे अनेकांना आपले काम सोडून इतर हंगामी व्यवसायाकडे वळावे लागले आहे. जुनी सांगवीत रिक्षा चालवून कुटुंब चालवणारे शेखर कोटकर यांनी यंदा ‘ना नफा-ना तोटा’ या तत्त्वावर गणेशमूर्ती विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. वयाची साठी गाठलेल्या कोटकरांची रिक्षा लॉकडाउनमुळे थांबली. त्यामुळे आर्थिक समस्या निर्माण झाली.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या रिक्षा सुरू झाली, तरी धंदा होत नाही. त्यामुळे त्यांनी काही दिवस फळे व भाजीविक्री केली. मात्र, आता गणेशमूर्ती विक्रीचा स्टॉल सुरू केला आहे. कुटुंबाची गरज व कामात गुंतून राहणे आवडते, असे त्यांनी सांगितले. त्यांचा एक मुलगा शिक्षण घेत असून, दुसरा खासगी नोकरी करीत आहे. दोघेही वडिलांना व्यवसायात हातभार लावतात. कोरोनामुळे यंदा सार्वजनिक उत्सवासाठी लागणाऱ्या मोठ्या मूर्त्या स्टॉलवर दिसणार नाहीत. एक ते दोन फूट आकाराच्या शाडू मातीच्या मूर्तींना परिसरात मागणी आहे. एक फुटाची शाडूची मूर्ती साधारण पाचशे रुपयापांसून सुरू होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

...या मूर्तींना मागणी 

पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ, जिलब्या मारुती, तुळशीबाग, कसबा गणपती, गुरुजी तालीम, केसरीवाडा, बालगणेश, फेटाधारी या मूर्तींना स्टॉलवर मागणी आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com