अनधिकृत पार्किंगने व्यापला रस्ता

रुग्णालयासमोर वाहने लावल्याने कोंडी अन् पादचाऱ्यांची होतेय दैना
pune
punesakal

वाकड : येथील डांगे चौक वाकड रस्त्यावरील एका मॉलमध्ये असलेल्या खासगी रुग्णालय व व्यावसायिकांच्या अनधिकृत पार्किंगमुळे संपूर्ण रस्ता व्यापला आहे. येथे अपघात, वाहतूक कोंडी नित्याची बनली असून, पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन मुख्य रस्त्यावरून ये-जा करावी लागत आहे. कारवाईची मागणी होत आहे. वाकड फाटा ते वाकड पोलिस ठाण्यापर्यंत अर्बन स्ट्रीट मॉडेल रस्त्याचे काम सुरू असल्याने हा संपूर्ण रस्ता निमुळता झाला आहे. (Pune News)

त्यात येथील व्यावसायिक व एका मोठ्या खासगी रुग्णालयाने मनमानी पद्धतीने रस्त्यावर आपली पार्किंग केली आहे. येथे येणाऱ्या मोटारी, दुचाकी, रुग्णवाहिका मुख्य रस्त्यावर असतात. त्यामुळे संपूर्ण रस्ता बेकायदा पार्किंगने व्यापला आहे. येथे अनधिकृत पार्किंगच्या वाहनांच्या रांगा लागतात. जाणाऱ्या वाहनांना आडकाठी होते. वाहतूक कोंडी अन् वारंवार अपघात नित्याचे झाले आहेत. पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन मुख्य रस्त्यावरून ये-जा करावी लागत आहे.

pune
सुया घ्या, बिबा घ्या, दाभण घ्या बाई! वैदू समाजाची भटकंती सुरूच

गेल्या महिन्यात १६ जुलै रोजी येथून पहाटे जाणाऱ्या बापूराव बाबूराव पवार व त्यांच्या पत्नी बेबी पवार यांना मालवाहतूक टेंपोने दिलेल्या धडकेत बापूराव यांना जागीच प्राण गमवावे लागले तर त्यांच्या पत्नी बेबी पवार या गंभीर जखमी झाल्या होत्या. या बाबत वाहतूक पोलिसांनी कडक पाऊले उचलीत, नो पार्किंगचे फलक लावावेत आणि वारंवार करावाई करावी अशी मागणी होत आहे.

pune
बिल्डर धार्जिणा विकास आराखडा; नागरिकांचा आराखड्याला विरोध

येथील बेशिस्त पार्किंगमुळे नेहमीच त्रास होतो. महत्वाच्या कामाला नेहमी खो बसतो. येथील व्यावसायिकांनी जणू रस्ताच आपल्या मालकी हक्काचा असल्याप्रमाणे संपूर्ण रस्त्यावर बस्तान मांडले आहे. पोलिसांनी याबाबत कारवाई केल्यास ही समस्या सुटू शकते.

- महावीर गांधी, रहिवाशी

याबाबत योग्य ती माहिती घेऊन, पाहणी करून त्वरित कारवाई केली जाईल. रस्त्यावर अनधिकृत वाहने पार्किंग केली जाऊ नये, यासाठी खबदरदारी घेऊन उपाययोजना केल्या जातील.

- विठ्ठल कुबडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, हिंजवडी वाहतूक विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com