आरटीई प्रवेश प्रक्रिया ठप्प; वेबसाइट, सर्व्हर डाऊन

आरटीई प्रवेश प्रक्रिया ठप्प; वेबसाइट, सर्व्हर डाऊन

पिंपरी : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) दिल्या जाणाऱ्या २५ टक्के प्रवेशासाठीचे संकेतस्थळ दुसऱ्याच दिवशी गुरुवारी (ता. ४) दुपारी तीनपर्यंत डाउन होते. पहिल्या दिवशी बुधवारी (ता. ३) एकही अर्ज भरला गेला नव्हता, तर गुरुवारी दिवसभरात केंद्रावर अवघे ३७ फॉर्म भरले गेले. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेसाठी आलेले पालक ताटकळत उभे राहिले. बरेच पालक सकाळी दहा वाजता येऊनही दुपारचे तीन वाजले तरीही रांगेतच होते. अर्ज भरता न आल्याने सर्वजण हैराण झाल्याचे केंद्रावर दिसून आले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या वर्षीची शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया तीन मार्चपासून सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी फॉर्म भरणारे कर्मचारीच न आल्याने प्रवेश प्रक्रियाच खोळंबली. प्रवेशाची अंतिम मुदत २१ मार्च आहे. यासाठी १७९ शाळा पात्र झाल्या आहेत. प्रवेश प्रक्रिया https://student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सुरू आहे. सध्या आकुर्डीतील फकीरभाई पानसरे उर्दू स्कूल, निगडीतील कल्पना इंग्रजी स्कूल, मोरवाडीतील एसएनबीपी स्कूल, जाधववाडीतील जीएसके स्कूल, भोसरीतील सिद्धेश्वर स्कूल, चऱ्होलीतील किड्स पॅराडाईज, कासारवाडीतील इनफंट जिझस, पिंपळे गुरवमधील किलबिल स्कूल, काळेवाडीतील बीटी मेमोरिअल असे मिळून १० केंद्रावर आरटीई अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

गुरुवारी सायंकाळी पाचपर्यंत भरले गेलेले अर्ज : 

  • किलबिल : १५ 
  • बीटी मेमोरिअल : २ 
  • फकीरभाई पानसरे : ५ 
  • कल्पना इंग्रजी स्कूल : ३ 
  • जीएसके : ७ 
  • एसएनबीपी : ३ 
  • पॅराडाईज : २ 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सर्व केंद्रांवर मिळून दिवसभरात ३७ अर्ज भरले गेले. उर्वरित केंद्रावर एकही अर्ज भरला गेला नाही. एम. एम शाळेत इंटरनेटची ऐनवेळी अडचण निर्माण झाली. त्या ठिकाणी फॉर्म भरणारा कर्मचारी आजारी असल्याने येऊ शकला नाही. त्यानंतर काळेवाडीतील बीटी मेमोरिअल सेंटर दिले गेले. या कामासाठी प्रत्येक सेंटरवर विषयतज्ज्ञ नेमले गेले आहेत. मात्र, दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील सर्व्हरचा गोंधळ संपता संपला नाही. त्यामुळे ‘पहिले पाढे पंचावन्न’ अशी परिस्थिती या संकेतस्थळाची व केंद्रांची आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com