'सकाळ'चे मुख्य वितरण व्यवस्थापक अब्दुल अजीज यांचे निधन

'सकाळ'चे मुख्य वितरण व्यवस्थापक अब्दुल अजीज यांचे निधन

पिंपरी : 'सकाळ'च्या वितरण विभागातील मुख्य व्यवस्थापक अब्दुल शकूर अजीज (वय 51, रा. साईराम पार्क, चांदणी चौक, कामगारनगर, खराळवाडी, पिंपरी) यांचे रविवारी (ता. 9) हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, तीन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.

अजीज यांनी पिंपरीतील एम. यू. महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी व पत्रकारितेची पदविका संपादन केली. महाविद्यालयाच्या हॉकी संघात ते होते. सांस्कृतिक व सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग असायचा. हिंदी, मराठी अनेक गाणी तोंडपाठ होती. 'सकाळ'मध्ये  'एक्‍झिक्‍युटीव्ह' पदावर 2000 मध्ये ते रुजू झाले. कष्ट आणि कामाच्या तळमळीतून त्यांची पदोन्नती होत मुख्य व्यवस्थापक पदावर पोहोचले होते.

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पंधरा दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाचे निदान झाले. त्यानंतर न्युमोनिया झाला. चिखली-साने चौकातील एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल केले होते. चार दिवसांपासून प्रकृतीत सुधारणा होत होती. मात्र, रविवारी सकाळी हृदयविकाराचा तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नेहरूनगर येथील दफनभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सध्याच्या पार्श्वभूमीवर नजिकच्या कुटुंबीयांच्याच उपस्थितीत त्यांचा जियारत विधी मंगळवारी सकाळी नेहरूनगर कब्रस्थानात करण्याचा निर्णय  कुटुंबीयांनी घेतला आहे. पुण्यातील अबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. सलमा अजीज आणि एम. एम. रंगूनवाला दंत महाविद्यालयातील प्रा. डॉ. अब्दुल समद यांचे ते बंधू होत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com