भाडेकरू राहण्यापेक्षा स्वतःच्या घरात रहा; ‘सकाळ’च्या ‘वास्तू एक्स्पो’तून घर घेण्याची संधी

पूर्वेकडच्या मोशी, चऱ्होलीपासून पश्चिमेकडील वाकड, किवळे-रावेत, पुनावळेपर्यंत आणि उत्तरेकडील चिखलीपासून दक्षिणेकडून सांगवी-नवी सांगवीपर्यंत विस्तारलेल्या पिंपरी-चिंचवडचा कायापालट होत आहे.
Sakal Vastu Expo 2022
Sakal Vastu Expo 2022Sakal
Summary

पूर्वेकडच्या मोशी, चऱ्होलीपासून पश्चिमेकडील वाकड, किवळे-रावेत, पुनावळेपर्यंत आणि उत्तरेकडील चिखलीपासून दक्षिणेकडून सांगवी-नवी सांगवीपर्यंत विस्तारलेल्या पिंपरी-चिंचवडचा कायापालट होत आहे.

पिंपरी - पूर्वेकडच्या मोशी, चऱ्होलीपासून पश्चिमेकडील वाकड, किवळे-रावेत, पुनावळेपर्यंत आणि उत्तरेकडील चिखलीपासून दक्षिणेकडून सांगवी-नवी सांगवीपर्यंत विस्तारलेल्या पिंपरी-चिंचवडचा कायापालट होत आहे. सध्या भाडेतत्वावर राहणाऱ्या, स्वत:चे घराचे स्वप्न बाळगणाऱ्या आणि गुंतवणूक म्हणून घराकडे पाहणाऱ्यासाठी ‘सकाळ’ने संधी उपलब्ध करून दिली आहे. एक व दोन ऑक्टोबर रोजी चिंचवडमध्ये ‘वास्तू एक्स्पो-२०२२’चे आयोजन केले आहे.

पूर्वी खेडे असलेल्या गावांनी आता पिंपरी-चिंचवडचे उपनगर म्हणून लौकिक मिळवला आहे. महापालिकेच्या माध्यमातून पायाभूत सुविधा उपलब्ध होत आहेत. राहण्यायोग्य म्हणून अनेक जण शहराला प्राधान्य देत आहेत. त्यामुळेच ‘सकाळ’ने वास्तू एक्स्पो आणले आहे. त्यात पिंपरी-चिंचवड व पुण्यासह परिसरातील बांधकाम व्यावसायिक सहभागी झाले आहेत. त्यामुळे एकाच छताखाली अनेक गृहप्रकल्पांची माहिती नागरिकांना मिळणार आहे. नागरिकांच्या सोयीसाठी ‘सकाळ’ने वास्तू एक्स्पोचे आयोजन चिंचवड स्टेशन येथील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटरमध्ये केले आहे.

पिंपळकर यांचे रविवारी व्याख्यान

प्रख्यात वास्तूतज्ज्ञ व ज्योतिर्विद्या पारंगत आनंद पिंपळकर यांचे वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र विषयावर रविवारी (ता. २) दुपारी चार वाजता होणार आहे. वास्तुशास्त्र काय आहे? त्याचे नियम प्लॅटला लागू पडतात का? विना तोडफोड फ्लॅटमधील वास्तू वास्तूशास्राप्रमाणे करता येते का? अशा शंकांचे निरसन व्याख्यानाच्या माध्यमातून होणार आहे.

बांधकाम व्यावसायिक म्हणतात...

सध्या घर खरेदीसाठी उत्तम वातावरण आहे. सर्वत्र सणांचा उत्साह आहे. त्यामुळे घरांसाठी मागणी वाढली आहे. सध्या ग्राहकांना परवडेल अशा दरांमध्ये घर उपलब्ध आहेत. ‘सकाळ वास्तू एक्स्पो’मधून दर्जेदार घरांची माहिती घेता येणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी. कारण, घर घेण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. शिवाय एकाच ठिकाणी अनेक प्रकल्पांची माहिती ग्राहकांना घेता येणार आहे. फरांदे स्पेसेसने सर्वसामान्य ग्राहकांचा विचार करून नवीन गृहप्रकल्प उभारले आहेत.

- आकाश फरांदे, फरांदे स्पेसेस

आमचे चिखली, मोशी, प्राधिकरण, वाकडे, पुनावळेत गृहप्रकल्प साकारत आहेत. त्यामुळे ग्राहकांसमोर पर्याय उपलब्ध आहे. शिवाय, ‘सकाळ वास्तू एक्स्पो’मध्ये एकाच ठिकाणी अनेक गृहप्रकल्पांची माहिती मिळणार आहे. अनेक घरे, गृहप्रकल्प, विविध ठिकाणांचे प्रकल्प असे पर्याय उपलब्ध होणार असल्याने ग्राहकांना तुलना करे सहज शक्य होऊन आपल्या आवडीचे घर निवडता येणार आहे. शिवाय, सध्या फेस्टिव्हल माहोल असल्याने घर बुकिंग करण्याची योग्य वेळ आली आहे.

- नरेंद्र अग्रवाल, ऐश्वर्यम हमारा

कधी?, कुठे?, केव्हा?

  • कधी - १ व २ ऑक्टोबर २०२२

  • कुठे - ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर, चिंचवड

  • केव्हा - सकाळी ११ ते रात्री ८

  • संपर्क - ९८८१७१८८४०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com