यंदा वारी नाही, तरी त्याच सेवाभावातून त्यांनी अशी जनजागृती केलीय पाहा

टीम ई सकाळ
मंगळवार, 30 जून 2020

यंदा कोरोनामुळे दरवर्षीप्रमाणे पालखी सोहळा नाही, तरी पण समर्थ रांगोळी कलाकारांनी आज (ता. 30) पालखी प्रस्थान सोहळा आळंदी येथे रांगोळीच्या माध्यमातून कोरोनाविषयी जनजागृती केली. 

पिंपरी : यंदा कोरोनामुळे दरवर्षीप्रमाणे पालखी सोहळा नाही, तरी पण समर्थ रांगोळी कलाकारांनी आज (ता. 30) पालखी प्रस्थान सोहळा आळंदी येथे रांगोळीच्या माध्यमातून कोरोनाविषयी जनजागृती केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

No photo description available.

समर्थ रांगोळीचे हे 20 वे वर्ष आहे. दरवर्षी सामाजिक विषय घेऊन प्रबोधन करत असतात. त्यात सेवाभाव व कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न असतो. 'बेटी बचाओ, बेटी पाढाओ,' 'रक्त नेत्र देह दान,' 'थेंब थेंब वाचवा' , 'झाडे लावा, झाडे जगवा', असा संदेश दिला जातो. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

No photo description available.

या वर्षी मोजक्‍या दोन-तीन कलाकार मिळून सर्व नियम पळून सेवा केली. कोरोना जनजागृतीसाठी सोशल डिस्टन्सिंग, 'मास्क वापरा,' 'पोलीस व डॉक्‍टर यांना सहकार्य करा' असे संदेश देत रांगोळीच्या पायघड्या घातल्या. यात संतोष आडागळे, स्मिता आडागळे, अक्षय घोळवे या कलाकारांनी रांगोळी काढल्या.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Samarth Rangoli artists created awareness about Corona through Rangoli at aalandi