शाळा सुरू,पण उर्दू शिकवणार कोण?पालक-विद्यार्थांमध्ये नाराजी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 6 January 2021

महापालिकेच्यावतीने 2015-16 मध्ये फुगेवाडी, खराळवाडी, नेहरूनगर, लांडेवाडी, थेरगाव व रुपीनगर या सहा ठिकाणी उर्दू माध्यमाच्या नववी ते दहावीचे वर्ग सुरू केले आहेत. 

पिंपरी (Pimpri News) - महापालिकेच्या माध्यमिक विभागाकडून सहा ठिकाणी इयत्ता नववी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग भरण्यास सुरवात केली आहे. परंतु हंगामी शिक्षक भरती नसल्यामुळे प्रत्यक्षात वर्गावर शिक्षक नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. परिणामी विद्यार्थ्यांना ना प्रत्यक्षात, ना ऑनलाइन शिक्षण मिळत असल्याची ओरड पालकांनी केली आहे.

महापालिकेच्यावतीने 2015-16 मध्ये फुगेवाडी, खराळवाडी, नेहरूनगर, लांडेवाडी, थेरगाव व रुपीनगर या सहा ठिकाणी उर्दू माध्यमाच्या नववी ते दहावीचे वर्ग सुरू केले आहेत. परंतु प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अद्याप या वर्गांना प्रथम मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे दरवर्षी या सर्व विद्यार्थ्यांचे दहावीचा परीक्षा अर्ज आकुर्डीतील उर्दू माध्यमिक विद्यालयातून भरावे लागतात. यावर्षी या शाळांमध्ये अद्यापपर्यंत शिक्षकांची भरती केलेली नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रवेशदेखील निश्‍चित केले नाहीत. त्यामुळे त्यांना ऑनलाइन शिक्षण मिळालेली नाही. तसेच त्यांचे अंतिम परीक्षेचे फॉर्म कोणी भरायचे हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. जर विद्यार्थ्याचे परीक्षेचे अर्ज मुदतीत भरले नाहीत, तर शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रशासनातर्फे हंगामी स्वरूपात शिक्षक भरती करण्याकरिता अर्ज मागविले आहेत. पण भरती केली नाही. काही विद्यार्थी आठवी उत्तीर्ण झाले आहेत, तरी त्यांना शाळा सोडल्याचा दाखला मिळालेला नसल्यामुळे पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांनी अर्ज शाळानिहाय मुख्याध्यापकाकडून संकलित केले नाहीत, अशी तक्रार पालक प्रतिनिधी अकील मुजावर यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याबाबत माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी पराग मुंढे म्हणाले, "आयुक्तांकडे फाइल पडून अद्याप आहे. सहा महिन्यांपासून सही झाली नाही.''

पिंपरी चिंचवडच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

""शिक्षण विभागाने दुजाभाव करू नये, शाळा सुरू करण्यासंदर्भात आदेश दिला आहे. परंतु सहा उर्दू शाळांमध्ये एकही शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे पालकांनी आणि विद्यार्थी नाराजी व्यक्त केली.''
-अकील मुजावर अध्यक्ष पिंपरी चिंचवड एज्युकेशन सोसायटी

''चंद्रकांत पाटलांनी पुन्हा कोल्हापूरला येऊन दाखवावं''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: School start after covid 19 pandemic but PCMC School Not recrutement For Urdu teacher