लैंगिक अत्याचारानंतर तिच्या पोटात दुखू लागलं, तेव्हा 'हा' प्रकार उघडकीस आला

लैंगिक अत्याचारानंतर तिच्या पोटात दुखू लागलं, तेव्हा 'हा' प्रकार उघडकीस आला

पिंपरी : जिवे मारण्याची व अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार नुकताच बावधन येथे उघडकीस आला. याप्रकरणी तिघांवर हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

या प्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. पीडित तरुणी  मूळची परभणी येथील असून बावधन येथे आत्याकडे राहत होती. दरम्यान, आत्याचा मुलगा तिला कामावर सोडून येतो म्हणून घेऊन गेला. त्यानंतर भुंडे वस्ती येथे एका ठिकाणी जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर लैगिक अत्याचार केला. याबाबत पीडित तरुणीने आत्याला व आत्याच्या नवऱ्याला सांगितले असता 'तू कोणालाही काही सांगू नकोस तो तुला मारून टाकेल' अशी धमकी दिली. 
दरम्यान, या घटनेच्या सात ते आठ दिवसांनंतर अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने पुन्हा तरुणीवर लैगिक अत्याचार केला. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, ही तरुणी लॉकडाउनमुळे मूळगावी परभणी येथे आई वडिलांकडे गेली असताना तिच्या पोटात दुखू लागले. दवाखान्यात तपासणी केली असता तरुणी गर्भवती असल्याचे समोर आले. त्यामुळे या प्रकरणाला वाचा फुटली. तरुणीने सर्व घटना सांगितल्यानंतर तिच्या आई वडीलांनाही धक्का बसला. 
त्यानंतर आरोपींविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्यात आली. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com