Budget : रुग्णालये, दवाखान्यांच्या आरोग्य सेवांचा दर्जा वाढविण्यासाठी ‘सोशल इम्पॅक्ट बॉंड’; शेखर सिंह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shekhar Singh statement budget Social Impact Bond to improve quality of health services of hospitals clinics

Budget : रुग्णालये, दवाखान्यांच्या आरोग्य सेवांचा दर्जा वाढविण्यासाठी ‘सोशल इम्पॅक्ट बॉंड’; शेखर सिंह

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने कर्करोग (कॅन्सर) रुग्णालय सार्वजनीक खासगी भागीदारी (पब्लीक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्वावर सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. तालेरा रुग्णालयात मल्टिस्पेशालीटी सेवा, वृध्दांसाठी रुग्णालय प्रस्तावित आहे.

त्याचबरोबर सामाजिक प्रभाव बॉंड (सोशल इम्पॅक्ट बॉंड)च्या माध्यमातून आरोग्य सेवांच्या दर्जा वाढवून सर्व रुग्णालये व दवाखाने ‘एनएबीएच’ प्रमाणित करण्याचेही प्रस्तावित आहे, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंगळवारी (ता. १४) दिली.

वैद्यकीय सुविधांसाठीअर्थसंकल्पात काय...

 • महापालिका नवीन ए. आय. तंतत्रज्ञानाचा वापर करुन

 • स्क्रीनींग व निदान सुधारण्यासाठी एक पाऊल पुढे टाकणार

 • पीपीपी तत्त्वावर कर्करोग रुग्णालय प्रस्तावित

 • मासुळकर कॉलनी येथे नेत्र रुग्णालय लवकरच सुरु करणार

 • तालेरा रुग्णालयात मल्टिस्पेशालीटी सेवा

 • तालेरा रुग्णालयात वृध्दांसाठी रुग्णालय प्रस्तावित

 • थेरगाव रुग्णालयात ट्रामा सेंटर, पुर्ण क्षमतेने सर्जरी सुरु करणार

 • थेरगाव रुग्णालयात नेत्रविभाग, कान-नाक-घसा शस्क्रिीया विभाग सुरु करणार

 • कै. प्रभाकर कुटे रुग्णालयात डायलेसिस, सर्जरी, अस्थिरोग विभाग सुरु करणार

 • वायासीएम रुग्णालय अद्ययावत करणे प्रस्तावित

 • महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये दंत चिकित्सा सुविधा सुरु करणार

 • वायासीएम रुग्णालयात अद्ययावत दंत उपचार सुविधा करणे प्रस्तावित

चिखलीत महापालिका रुग्णालयाचा सुरुवातीला प्रस्ताव होता. परंतु; वन विभागाने आक्षेप घेतल्याने ती जागा बदलली. मोशी येथे भविष्यात रुग्णालयाच्या विस्तारीकरणाच्या दृष्टीने जागा अंतिम केली.

वैद्यकीय रुग्णालयात भविष्यात पदव्युत्तर पदवी शिक्षणाची सोय वाढविल्यास विद्यार्थी डॉक्टर वाढतील. त्यामुळे मोशीतील रुग्णालयाचे २०० कोटी ‘बजेट’ वाढले. या रुग्णालयाचे खासगीकरण करणार नाही.

पर्यायी वित्तपुरवठा घ्यायचा का, असे विचाराधीन आहे, असा खुलासा पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंगळवारी (ता. १४) केला. ‘सकाळ’ने मोशी रुग्णालयाचे सुमारे २०० कोटींचे ‘बजेट’ वाढल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. महापालिकेचा सन २०२३-२०२४ या अर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.