esakal | शिवसेनेचा पालिकेतील गटनेता कोण? 

बोलून बातमी शोधा

शिवसेनेचा पालिकेतील गटनेता कोण? }

महापालिकेची आगामी निवडणूक विचारात घेता, महिला म्हणून चिंचवडे यांना शिवसेना संधी देणार की पुरुषाच्या गळ्यात गटनेतेपदाची माळ पडणार, हे, काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

शिवसेनेचा पालिकेतील गटनेता कोण? 
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांना पक्षश्रेष्ठींनी राजीनामा देण्यास सांगितले आहे. त्यामुळे नविन गटनेता कोण, याची चर्चा सुरू झाली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महापालिकेच्या १२८ नगरसेवकांमध्ये शिवसेनेचे अवघे नऊ नगरसेवक आहेत. त्यातही दोन गट आहेत. त्यावरून पक्षात धुसफूस सुरू आहे. त्यात महापालिका स्थायी समितीवर एक सदस्य निवडीवरून झालेल्या अंतर्गत राजकारणाची भर पडली. पक्षाचे गटनेते कलाटे यांचा स्थायी समितीतील दोन वर्षांचा कार्यकाळ रविवारी (ता. २८) संपला. त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागेसाठी १८ फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत पक्षातून मीनल यादव यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, पक्ष नेतृत्वाने अश्‍विनी चिंचवडे यांचे नाव सुचविले होते. गटनेते कलाटे यांनी चिंचवडे यांच्याऐवजी यादव यांच्या नावाचे पत्र पीठासन अधिकारी महापौर उषा ढोरे यांच्याकडे दिले. त्यामुळे यादव यांची वर्णी स्थायी समितीवर लागली आणि पक्षशिस्तीचा ठपका ठेवत शिवसेना सचिव अनिल देसाई यांनी कलाटे यांना गटनेतेपदाचा राजीनामा मागितला. आता स्थायीची संधी हुकल्याने चिंचवडे यांना गटनेतेपद मिळण्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, महापालिकेची आगामी निवडणूक विचारात घेता, महिला म्हणून चिंचवडे यांना शिवसेना संधी देणार की पुरुषाच्या गळ्यात गटनेतेपदाची माळ पडणार, हे, काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप