शिवसेना नेत्यांनी महाआघाडीच्या कोअर कमिटीत मुद्दे का मांडले नाही - अजित पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

शिवसेनेचे आमदार फुटण्यास अजित पवार जबाबदार असतील तर; शिवसेना नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या तीन पक्षांच्या समन्वय समितीत (कोअर कमिटीत) हा मुद्दा त्याच वेळी का मांडला नाही.

शिवसेना नेत्यांनी महाआघाडीच्या कोअर कमिटीत मुद्दे का मांडले नाही - अजित पवार

पिंपरी - शिवसेनेचे आमदार फुटण्यास अजित पवार जबाबदार असतील तर; शिवसेना नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या तीन पक्षांच्या समन्वय समितीत (कोअर कमिटीत) हा मुद्दा त्याच वेळी का मांडला नाही, असा प्रतिसवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिवसेनेचे नेते, माजी मंत्री रामदास कदम यांच्या टिकेवर शनिवारी (ता. ६) चिंचवड येथे पत्रकार परिषदेत केला.

शिवसेनेचे आमदार फुटण्यास अजित पवार जबाबदार आहेत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शंभर आमदार करण्याचा चंग बांधला होता. त्यामुळे ते शिवसेनेच्या आमदारांना संपविण्याचे काम करत होते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना वाचविण्यासाठी भाजपबरोबर गेले, अशी टिका रामदास कदम यांनी माध्यमांवर केली होती. याबाबत विचारले असता पवार बोलत होते.

अजित पवार म्हणाले की, महाआघाडीच्या कोअर कमिटीत शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची कोअर कमिटी होती. यामध्ये तीनही पक्षाचे प्रत्येकी दोन नेते होते. हे जर त्यांच्या लक्षात आले होते तर; त्यांनी त्याचवेळी शिवसेनेच्या नेत्यांनी कमिटीच्या बैठकीत हा मुद्दा का मांडला नाही.

आगामी काळातील महापालिका निवडणुका राजकीय परिस्थिती नुसार लढविल्या जातील. महागाई विरोधात आम्ही आंदोलन करु पण जनतेत उद्रेक झाला पाहिजे. आणीबाणीचे उदाहरण आपणाकडे आहे, असे ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे सचिवांना दिलेले अधिकार हे न्यायिक प्रश्‍नांबाबतच होते, असे म्हटले आहे, यावर विचारले असता अजित पवार यांनी त्याबाबतचे दिनांक ४ ऑगस्टचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांचे पत्रच पत्रकार परिषदेत फडकविले. ते म्हणाले की, या आदेशात पुढील आदेशापर्यंत म्हटले आहे. त्यामुळे ते आज असे म्हणू शकतात. अतिवृष्टीच्या भागात राज्य सरकारचे लक्ष नाही. पंचनामे करुन मदत द्या, अशीच आमची मागणी आहे. पण; तसे होताना दिसत नाही. त्यासाठी खुप पाठपुरावा करावा लागतो, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Shiv Sena Leaders Did Not Raise The Issues In The Core Committee Of The Grand Alliance Ajit Pawar Politics Pimpri Chinchwad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..