पिंपरी-चिंचवड : दुकाने उद्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहतील

पिंपरी चिंचवड शहरातील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवार यांनी रविवारी घेतला.
Ajit Pawar
Ajit PawarSakal

पिंपरी - पिंपरी चिंचवड शहरातील (Pimpri Chinchwad City) निर्बंध (Restriction) शिथिल करण्याचा निर्णय (Decision) पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी रविवारी घेतला. त्यानंतर महापालिका आयुक्त राजेश पाटील (Rajesh Patil) यांनी निर्बंध शिथिल करण्याबाबतचा आदेश काढला. त्यानुसार अत्यावश्‍यक सेवेसह सर्व दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत खुली राहणार.

शहरातील मॉल आठवड्यातील सर्व दिवस रात्री आठ पर्यंत सुरू राहणार. मात्र, कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाच खरेदीसाठी जाता येईल. मॉलमधील कर्मचाऱ्यांचे दोन्ही डोस झाले पाहिजेत व दर १५ दिवसांनी त्यांची कोरोना चाचणी करावी हॉटेल, रेस्टॉरन्स, फूड कोर्ट ५० टक्के क्षमतेने आठवड्याचे सर्व दिवस रात्री १० पर्यंत खुले असतील. पार्सल सेवा पूर्वीप्रमाणे रात्री ११ पर्यंत सुरू राहील.

Ajit Pawar
पिंपरी-चिंचवडमध्ये आज नवीन २१५ रुग्ण

शहरातील उद्याने सुरू होणार आहेत. सकाळी ६ ते १० व दुपारी ४ ते सायंकाळी ७ वया वेळेत खुले असतील. पूर्वीप्रमाणे सर्व इनडोअर व आउट डोअर खेळ सुरू राहतील. मात्र, जलतरण व निकट संपर्क येणारे खेळ बंद असतील. शहरातील शाळा महाविद्यालये आत्ताच सुरू होणार नाहीत. केवळ आॅनलाइन शिक्षण सुरू असेल. खासगी क्लासेस, स्पर्धा परीक्षा केंद्र रात्री ८ पर्यंत ५० टक्के क्षमतेने सुर राहणार. शिक्षक व विद्यार्थ्यांचा लसीचा किमान एक डोस आवश्‍यक आहे.

जीम, सलून, ब्युटी पार्लर, वेलनेस सेंटर स्पा अप्वाइनमेंट घेऊन क्षमतेच्या आसन क्षमतेच्या ५० टक्के रात्री ८ पर्यंत सुरू राहतील. शहरात पहाटे पाच ते रात्री ११ पर्यंत जमावबंदी असेल. रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत संचारबंदी असेल. केवळ अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडता येईल. शहरातील चित्रपट गृह, मल्टीप्लेक्स अद्याप बंदच असणार. धार्मिक स्थळेही बंदच राहणार. पीएमपी सेवा ५० टक्के आसन क्षमतेने सेवा सुरू राहणार. सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम आसन क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीत घेता येतील. ५० जणांच्या उपस्थितीत लग्न समारंभ करता येतील. २० जणांच्या उपस्थितीत अंत्यविधी करता येतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com