शॉर्टसर्किटमुळे इमारतीत पसरला धूर; आठ जणांची सुटका 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 29 January 2021


शुक्रवारी पहाटे सव्वा चारच्या सुमारास  आगीबाबत अग्निशामक दलास माहिती दिली. त्यानुसार अग्निशामक मुख्यालय आणि भोसरी उपकेंद्रातून आगीचे बंब घटनास्थळी रवाना झाले.

पिंपरी :  शॉर्टसर्किटमुळे इलेक्ट्रिक मीटर बॉक्सला लागलेल्या आगीमुळे इमारतीत मोठ्या प्रमाणात धूर पसरला. यामध्ये  अडकलेल्या आठ रहिवाशांची अग्निशामक दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. ही घटना शुक्रवारी (ता.२९) पहाटे मोशी येथे घडली. अमोल प्रभाकर करके (वय ४०), अमिता अमोल करके (वय ३६), खंडप्पा सुभाष गोवे (वय ४४), कीर्ती खंडाप्पा गोवे (वय ३६), श्रीकृष्ण बोंगरंगे  (वय ३३), ज्योती गव्हाणे (वय ३६), आकांशा करके (वय ०८), अनुज करके (वय ०६, सर्व रा.कृष्ण कुंज सोसायटी, मोशी प्राधिकरण) अशी सुटका केलेल्या नागरिकांची नावे आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शुक्रवारी पहाटे सव्वा चारच्या सुमारास  आगीबाबत अग्निशामक दलास माहिती दिली. त्यानुसार अग्निशामक मुख्यालय आणि भोसरी उपकेंद्रातून आगीचे बंब घटनास्थळी रवाना झाले.

दृष्टीहीन रिना पाटील बनल्या 1 दिवसाच्या पोलिस आयुक्त 

कृष्णकुंज या इमारतीच्या जिन्याजवळ असलेल्या मीटर बॉक्स, इन्वर्टर आणि बोरवेल पॅनलला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. वायरचा धूर इमारतीत पसरला. यामुळे इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील आठ लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तसेच जिन्यात मोठ्या प्रमाणात साठलेल्या धुरामुळे खाली देखील उतरता येत नव्हते. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी शिडी व श्वसन यंत्राचा वापर करून इमारतीमधील आठही जणांना सुखरूप बाहेर काढले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Smoke spread in building due to short circuit at Moshi