नको, नको म्हणणारे, आता म्हणताहेत लॉकडाउन करा 

Spontaneous closures are being observed in Pimpri-Chinchwad and other villages in Mavala
Spontaneous closures are being observed in Pimpri-Chinchwad and other villages in Mavala

पिंपरी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सुरूवातीला तातडीने सर्वत्र लॉकडाउन लागू करण्यात आला. मात्र, काही दिवसातच त्यास विरोध होऊन तो हटविण्याची मागणी होवू लागली. त्यानुसार काही दिवसातच लॉकडाउन शिथिल करण्यात आला. मात्र, आता कोरोनाचा उद्रेक होऊ लागला असून मृत्यूचा आकडाही वाढत आहे. त्यामुळे याअगोदर नको म्हणणारे आता कडक लॉकडाउन करण्याची मागणी करीत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरासह मावळातील गावागावात उत्स्फूर्तपणे बंद पाळले जावू लागले आहेत. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्यात 9 मार्चला पहिला कोरोनाचा रूग्ण आढळला. त्यानंतर हळूहळू ठिकठिकाणी रूग्ण आढळू लागल्याने 24 मार्चपासून सर्वत्र लॉकडाउन लागू करण्यात आला. सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. लॉकडाउनची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत 64 ठिकाणी नाकाबंदी तर सीमारेषेवर 13 तपासणी नाके उभारण्यात आले होते. विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात होता. तरीही काही नागरिक खोटे सांगून घराबाहेर पडत होते. दरम्यान, लॉकडाउनमुळे घरी बसून वैतागलेले नागरिक व काही लोकप्रतिनिधी, विविध संघटना लॉकडाउन उठविण्याची मागणी करू लागले. त्यानुसार मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लॉकडाउन शिथिल करण्यात आला. केवळ रूग्ण आढळलेल्या भागास कन्टेन्मेंट झोन घोषित करुन त्याठिकाणचे निर्बंध कायम ठेवण्यात आले. तसेच ठराविक दुकाने वगळून इतर दुकाने सुरू ठेवण्यास अटी-शर्ती घालून परवानगी देण्यात आली. मात्र, अनेकजण कामांव्यतिरिक्तही घराबाहेर पडू लागले. तसेच दुकाने सुरू ठेवल्यास सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता तोंडाला मास्क न लावणाऱ्यांचेही प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले. यामुळे रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिवसाला तीन ते पाच आढळणाऱ्या रूग्णांचा आकडा शेवटच्या आठवड्यात 15 ते 20 वर पोहोचला. हाच आकडा जूनच्या शेवटच्या आठवड्यात दीडशे ते दोनशेवर पोहोचला. 6 जुलै (सोमवारी) तर एकाच दिवशी तब्बल 573 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. अद्यापपर्यंत शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा 4 हजार 861 वर पोहोचला असून 67 जणांचा मृत्यू झाला आहे. अशीच परिस्थिती ग्रामीण भागात आहे. श्री क्षेत्र देहू येथे मागील अडीच महिन्यात एकही रूग्ण नव्हता. 13 जूनला पहिला रूग्ण आढळला. त्यानंतर आतापर्यंत एकाच गावात तब्बल 40 रूग्ण आढळले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. 


पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वेगात वाढणारी रूग्णसंख्या चिंतेची बाब बनली आहे. एकीकडे प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत तर दुसरीकडे नागरिकांच्याही पायाखालची जमीन सरकू लागली आहे. याअगोदर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घरात बसा असे प्रशासनाकडून सांगत कारवाईचा बडगा उगारावा लागत होता. पोलिसांनी अनेकांना लाठीचा प्रसादही दिला. लॉकडाउन कालावधीत सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 188 कलमांतर्गत तब्बल 18 हजार 729 जणांवर कारवाई केली. तर मास्क न वापरल्याप्रकरणी तीन हजार 589 जणांवर कारवाई झाली असून दोन हजार 393 वाहने जप्त केली.  तरीही नागरिक घरात बसण्यास तयार नव्हते. कोणत्या ना कोणत्या कारणाने बाहेर पडत होती. आता मात्र उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिक व लोकप्रतिनिधींकडूनच कडक लॉकडाउनची मागणी होऊ लागली आहे. काही ठिकाणी तर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यास सुरूवातही केली आहे. 

पोलिसांवरच हल्ला 
कोरोनाबाधित रूग्ण आढळलेला भाग कंटेन्मेंट झोन घोषित केले जात असून याठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात केला जातो. अशाचप्रकारे नागरिकांच्याच सुरक्षिततेसाठी चिंचवड स्टेशन येथील आनंदनगर येथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवर तेथील रहिवाशांनीच हल्ला केला. याप्रकरणी 48 जणांवर गुन्हाही दाखल झाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

उत्स्फुर्तपणे बंद पाळण्यात आलेली ठिकाणे 
लोकप्रतिनिधी, प्रशासन व ग्रामस्थ एकत्रित येत उत्स्फूर्तपणे बंद पाळण्याचा निर्णय घेत आहेत. तळेगाव दाभाडे येथे नुकताच तीन दिवसांचा बंद पाळण्यात आला. यासह देहूरोड येथेही चार दिवस सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. श्रीक्षेत्र देहूत 8 ते 21 मे या कालावधीत बंद पाळण्यात येणार आहे. दिघी येथील नागरिकांनीही बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. यासह पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही आठवड्यात रविवार व गुरूवारी जनता कर्फ्यू पाळण्याबाबत शहरवासियांना आवाहन केले आहे. 

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केलेली कारवाई 
मास्क न वापरणे - 3589 
वाहन जप्त - 2393 
सरकारी आदेशाचे उल्लंघन - 18 हजार 729 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com