भोसरी, दिघी परिसरातील लाॅकडाउनसारखा कडक लाॅकडाउन सर्वांनी पाळला तर...   

bho.jpg
bho.jpg

भोसरी  ः कोरोना व्हायरसच्या संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी राज्य शासनाने घोषीत केलेला लॅाकडाऊन यशस्वी करण्यासाठी भोसरी, इंद्रायणीनगर, दिघी आदी भागातील कोही मोजक्या मुख्य चौकातच पोलिस बंदोबस्त दिसून आला. इतर भागांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त नसतानाही  भोसरी, इंद्रायणीनगर, दिघी भागातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तपणे लॅाकडाऊनचे पालन करत घराबाहेर येणे टाळले आणि दुकानदारांनीही सर्व दुकाने बंद ठेवल्याने  दुसऱ्या दिवशीही लॅाकडाऊन यशस्वी झाला.

केंद्र सरकारने पुकारण्यात आलेल्या लॅाकडाऊनच्या काळात भोसरी, इंद्रायणीनगर, दिघी आदी भगातील प्रत्येक चौकात पोलिसांचा जागता पहारा होता. जागोजागी पोलिसांची वाहनेही दिसत होती. त्यामुळे केंद्राचा लॅाकडाऊन यशस्वी झाला. मात्र राज्य शासनाने घोषीत केलेल्या लॅाकडाऊनच्या काळामध्ये भोसरीतील बीआरटीएस चौक, टेल्को रस्त्यावरील यशवंतनगर चौक,  इंद्रायणीनगरातील श्री तिरुपती बालाजी चौक, दिघीतील पणे-आळंदी रस्त्यावरील बोपखेल फाटा आणि देहूफाटा  आदी चौकांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त ठेवला आहे.  

चौकांमध्ये बॅरिकेट्स लावून वाहनांना अडथळा निर्माण करत वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. मात्र या मुख्य चौकाचा अपवाद वगळता  इतर चौकांमध्ये पोलिस दिसून येत नाहीत. मात्र असे असतानाही  भोसरी, इंद्रायणीनगर, दिघी आदी भागातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तपणे लॅाकडाऊनमध्ये सहभाग घेत लॅाकडाऊन यशस्वी केला आहे. त्यामुळे लॅाकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी (ता. १५)  नेहमीच गजबज असलेल्या भोसरीतील पीएमटी चौक, आळंदी रस्ता, दिघी रस्ता, पीसीएमटी चौक, लांडेवाडी चौक, पुणे-नाशिक महामार्गाचा शितलबाग ते धावडेवस्तीपर्यंतचा रस्ता, दिघीतील छत्रपती संभाजी राजे चौक, पुणे-आळंदी रस्ता, मॅगझीन चौक, इंद्रायणीनगरातील मिनी मार्केट चौक, श्री तिरुपती बालाजी चौक, साई चौक, इंद्रायणी चौक आदी भागात शुकशुकाट होता.

 भोसरी, इंद्रायणीनगर, दिघी आदी परिसरात बुधवारी (ता. १५) सकाळी पोलिसांद्वारे पेट्रोलिंग करत नागरिकांना लॅाकडाऊनच्या काळात घराबाहेर न येण्याचे आवाहन केले. सकाळी साडेआठ वाजेपर्यंत परिसरातील दूध केंद्रे सुरू होती. परिसरातील औषधांची दुकाने, दवाखाना, बॅंक आदी  सुरू होती. मात्र नागरिकांची वर्दळ येथे कमी प्रमाणात दिसली. भोसरीतील दिघी रस्ता, आळंदी रस्ता, पुणे-नाशिक महामार्ग, टेल्को रस्ता आदी रस्त्यांवर वाहनांची तुरळक वर्दळ दिसली.  त्याचप्रमाणे विविध ठिकाणी जाणाऱ्या कामगारांची ये-जाही पहायला मिळाली.

पेट्रोल सर्वांसाठी कशाला?... केंद्र सराकरने घोषीत केलेल्या लॅाकडाऊन काळामध्ये पेट्रोलपंपावर पेट्रोल कोरोना व्हायरस संसर्ग थांबविण्यासाठी काम करत असलेल्या व्यक्तिंनाच देण्याची सक्ती केली होती. मात्र या लॅाकडाऊनमध्ये पेट्रोल सरसकट सर्व नागरिकांना मिळत आहे. त्यामुळे काही नागरिक विनाकारणही रस्त्यावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पेट्रोलपंपावर पेट्रोल कामगार आणि कोरोना व्हायरस संसर्ग थांबविण्यासाठी करत असलल्या संबंधित व्यक्तिंनाच देण्यात यावी अशी मागणी काही सजग नागरिकांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com