पिंपरी-चिंचवड शहरातील अशी आहे लॉकडाउनची स्थिती...

Lock Down
Lock Down

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात मध्यरात्रीपासून (ता.14) लॉकडाउन लागू झाला. कडक लॉकडानची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी मध्यरात्रीपासूनच 66 ठिकाणी नाकाबंदी केली असून, ठिकठिकाणी पोलिस तैनात झाले आहेत. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांकडून करडी नजर ठेवली जात आहे. 

पिंपरी चिंचवड शहरातील पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्या 7637 झाली असून, मृतांची संख्या 120 वर पोहचली आहे. दररोज मोठ्या प्रमाणात वाढणारा रुग्णांचा आकडा लक्षात घेता शहरात पुन्हा लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मध्यरात्रीपासूनच कडक लॉकडाउनची अंमलबजावणी सुरु झाली आहे. पोलिस आयुक्तांनी संचारबंदीचे आदेश काढले आहेत. त्यामुळे या कालावधीत विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कडक कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात झाली  असून यासाठी पोलिसांनी नियोजन केले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपरी-चिंचवड शहरात प्रवेश करणाऱ्या 13 ठिकाणी चेकपोस्ट तर शहरातील मुख्य रस्त्यांसह चौकांत 53 ठिकाणी नाकाबंदी केली आहे. नाकाबंदीच्या ठिकाणी सोमवारी रात्रीच बॅरिगेटस लावण्यात आले. प्रत्येक नाकाबंदीच्या ठिकाणी एक अधिकारी व चार कर्मचारी आहेत. वाहनचालकांकडे चौकशी करूनच पुढे सोडले जात आहे. यासह गस्तही वाढविण्यात आली  आहे.

त्यांची झाली अडचण...

मध्यरात्री बारा वाजता नाकाबंदी करण्यात आली. मात्र, त्यापूर्वी घराबाहेर अथवा शहराबाहेर गेलेल्यांपुढे पुन्हा शहरात परतताना मोठी अडचण निर्माण झाली. नाकबंदीच्या ठिकाणी त्यांची चौकशी केली जात असून, ठोस कारण सांगितल्यानंतरच पुढे सोडले जात आहे. तसेच अत्यावश्यक काम व पासशिवाय रस्त्यावर फिरू नये, अशीही तंबी पोलिसांकडून दिली जात आहे.

(Edited By : Krupadan Awale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com