भोसरीत रेशन दुकानदारांचा बंदला संमिश्र प्रतिसाद; 'या' तारखेपासून मिळणार धान्य

भोसरीत रेशन दुकानदारांचा बंदला संमिश्र प्रतिसाद; 'या' तारखेपासून मिळणार धान्य

पिंपरी : भोसरी परिसरात स्वस्त धान्य दुकानदारांच्या बेमुदत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अनेक दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटप चालूच असल्याचा दावा अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या फ परिमंडळाने केला आहे. मंगळवारपासून (ता. 9) विना शिधापत्रिकाधारकांना तांदूळ आणि हरभऱ्याचे (चणा) वाटप चालू होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरात अन्नधान्य वितरण कार्यालयाची अ (चिंचवड), ज (पिंपरी) आणि फ (भोसरी) असे तीन विभाग कार्यरत आहेत. त्यापैकी फ परिमंडल कार्यालयाअंतर्गत एकूण 83 स्वस्त धान्य दुकाने असून, त्यांना सुमारे 37 हजार 738 शिधापत्रिकाधारक जोडले गेले आहेत. सध्या अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणे स्वस्त धान्य दुकानदारांनाही विमा संरक्षण दिले जावे, या मुख्य मागणीसाठी ऑल महाराष्ट्र रेशनिंग फेअर प्राईस शॉपकीपर फेडरेशनने बेमुदत बंद पुकारला आहे. या बंदला भोसरी परिसरात दुकानदारांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फ परिमंडल अधिकारी नागनाथ भोसले म्हणाले, "भोसरी परिसरात (फ विभाग) बेमुदत बंदला स्वस्त धान्य दुकानदारांचा संमिश्र प्रतिसाद आहे. काही ठिकाणी शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटप चालू आहे. मोफत धान्यासाठी 39 हजार 745 अर्ज विनाशिधापत्रिकाधारकांचे अर्ज आले होते. त्यापैकी 28 हजार 150 अर्ज मंजूर झाले आहेत. त्यांना 5 किलो तांदूळ प्रतिव्यक्ती आणि प्रतिकुटूंब 1 किलो हरभऱ्या (चणा)चे वाटप केले जाणार आहे. त्यांना 2814.50 क्विंटल तांदूळ वाटप केले जाणार असून, येत्या 2 दिवसांत तो दुकानदारांपर्यंत पोचेल. तर 160 क्विंटल हरभरा (चणा) येणे बाकी असून, मंगळवारपासून हे धान्य एकत्रितच विनाशिधापत्रिकाधारकांना देण्याचा आमचा प्रयत्न राहील.''

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com