विहिरीतून विषारी साप बाहेर काढण्यात यश

विहिरीत पडलेल्या घोनस जातीच्या चार फूट लांबीच्या विषारी सापाला सर्पमित्रांनी जोखिम पत्करून जीवदान दिले.
Snake
SnakeSakal
Summary

विहिरीत पडलेल्या घोनस जातीच्या चार फूट लांबीच्या विषारी सापाला सर्पमित्रांनी जोखिम पत्करून जीवदान दिले.

वाकड - तीन दिवसांपासून विहिरीत पडलेल्या घोनस जातीच्या चार फूट लांबीच्या विषारी सापाला सर्पमित्रांनी जोखिम पत्करून जीवदान दिले. त्या सापाला निसर्गाच्या सानिध्यात सुरक्षितपणे सोडण्यात आले.

हिंजवडी शेजारील घोटावडे ग्रामपंचायतच्या सदस्या सारिका खाणेकर यांच्या विहिरीत विषारी साप पडल्याची माहिती त्यांनी सर्पमित्र हभप. शेखर महाराज जांभुळकर यांना दिली. त्यानुसार सकाळी नऊ वाजता वाईल्ड ऍनिमल अँड स्नेक प्रोटेक्शन सोसायटीचे सदस्य शेखर जांभुळकर, गणेश भुतकर, किरण जांभुळकर या सर्पमित्रांनी घटनास्थळी जाऊन घोणस जातीच्या सापाला दोरीच्या साहाय्याने सुरक्षित बाहेर काढले.

लोकप्रतिनिधीत्व करत असताना माणसांचीच नव्हे तर प्राण्यांची ही सेवा करायला हवी. त्यांच्यावर भूतदया दाखवावी अशी भूमिका सारिका खाणेकर आणि खाणेकर परिवाराने व्यक्त केली. एक जीव वाचविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com