कारखान्याच्या यशात ऊस उत्पादक शेतकरी व संचालक मंडळाचा वाटा - नानासाहेब नवले

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या यशात सर्व संचालक मंडळासह, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मोलाचा वाटा आहे त्यामुळे सहवीज निर्मितीबरोबर आपण ईथेनॉल प्रकल्प कार्यान्वित करण्याची मजल मारली.
Nanasaheb navale
Nanasaheb navaleSakal
Summary

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या यशात सर्व संचालक मंडळासह, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मोलाचा वाटा आहे त्यामुळे सहवीज निर्मितीबरोबर आपण ईथेनॉल प्रकल्प कार्यान्वित करण्याची मजल मारली.

हिंजवडी - श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या यशात सर्व संचालक मंडळासह, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मोलाचा वाटा आहे त्यामुळे सहवीज निर्मितीबरोबर आपण ईथेनॉल प्रकल्प कार्यान्वित करण्याची मजल मारली. परंतु, ह्या प्रकल्पाचा प्रस्ताव प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या लालफितीत अडकला आहे. याबाबत सर्व पक्षीय नेते मंडळी व संबंधित खात्याचे मंत्री आपल्याला सहकार्य करीत आहेत असे प्रतिपादन माजी खासदार व संत तुकाराम कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब तथा विदुरा नवले यांनी केले.

नवले यांच्या अध्यक्षतेखाली वाकड येथील संत तुकाराम गार्डन मंगल कार्यालयात आयोजित ३३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला मार्गदर्शन करताना बोलत होते. या सभेला मावळचे आमदार सुनील शेळके, माजी आमदार दिगंबर भेगडे, ज्ञानेश्वर लांडगे, पिडीसीसी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, भाऊसाहेब भोईर, बाबुराव वायकर, शंकरराव शेलार, रामभाऊ ठोंबरे, शांताराम गराडे, जि.पच्या माजी अध्यक्षा प्रा. सविता दगडे, महादेव कोंढरे, संचालक ज्ञानेश्वर दाभाडे, बाळासाहेब विनोदे, दिलीप दगडे, अनिल लोखंडे, सुभाष राक्षे, बाळासाहेब बावकर, बाळकृष्ण कोळेकर, अंकुश उभे, प्रविण काळजे, तज्ञ संचालक ज्ञानेश नवले, वसंत साखरे, एमएससी बँकेचे तपासणी अधिकारी वि.व्ही. धुमाळ, प्रभारी सचिव मोहन काळोखे, आजी-माजी संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवले पुढे म्हणाले, सिमेंट कॉन्क्रीटचे वाढते जंगल कारखान्याच्या भवितव्यासाठी घातक आहे हे पीक आता कारखाना स्थळापर्यंत पोहचले आहे हेच संत तुकाराम पुढील मोठे आव्हान असून शहरी करणाच्या रेट्यात अडकलेल्या थेऊर कारखान्यागत आपली परिस्थिती होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी एकरी उत्पादन वाढवावे. कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे म्हणाले, एक हजार शेतकऱ्यांचे प्रतिएकरी पंधरा टना पेक्षा उत्पादन कमी आहे. त्यामुळे तोडणी खर्च वाढत असून शेतकऱ्यांना मिळणारा फायदा कमी होतो. दुर्गम भागातील शेतकऱ्यांनी स्वखर्चाने ऊसतोड मजूर लावून ऊस कारखाना स्थळापर्यत पोच केल्यास त्या शेतकऱ्यांना वाहतूक व इतर खर्च वगळता पन्नास रुपये अधिकचा दर दिला जाईल.

सभेच्या सुरुवातीला कार्यकारी संचालक साहेबराव पठारे यांनी मागील सभेचा इतिवृतांत व सभेची नोटीस तसेच सभेपुढील विषय वाचून दाखवले त्यास उपस्थितांनी हात वर करून आवाजी मंजुरी दिली. ऐन वेळच्या विषयांत शेतकरी भाऊसाहेब आवटे यांनी ऊस कामगार, कारखान्यातील कर्मचाऱ्यांप्रमाणे शेतकऱ्यांना देखील विमा कवच देण्याची मागणी केली, ज्ञानेश्वर साठे यांनी कोळवण खोऱ्यातील पाणी पुरवठा व ऊस तोडणीस होणारा विलंब यावर मार्ग काढण्याची मागणी केली. शांताराम भालेकर म्हणाले तुकाराम महाराजांच्या नावेकारखाना आहे त्यामुळे पुढील वर्षांपासून सर्व साधारण सभा तुकोबारायांची पावन भूमी देहूत व्हावे.

देहूत भंडारा डोंगरावर तुकोबारायांच्या भव्य दिव्य व ऐतिहासिक मंदिराच्या जिर्णोद्धराचे काम प्रगती पथावर आहे. त्याकरिता सर्व सभासद व संचालक मंडळाने मंदिराच्या उभारणीला हातभार लावावा, मंदिर साकारणे ही तुम्हा-आम्हा सर्वांची नैतिक जबाबदारी असून प्रत्येकाने यथा शक्ती योगदान देण्याचे जाहीर आवाहन नवले यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com