चहाची तलफ भागवायची कशी? चहाशौकिन झाले बेचैन

मंगेश पांडे
शुक्रवार, 22 मे 2020

- चहा मिळत नसल्याने चहाशौकिन झाले बेचैन

पिंपरी : चहाला वेळ नसते, पण वेळेला चहा हवा, असे म्हटले जाते. चहाच्या वेळेला चहा नसल्यास अक्षरश: बेचैन होते. अशा चहा शौकिनांची तलफ भागविण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात ठिकठिकाणी छोट्या टपऱ्यांसह लाखो रुपये खर्च करून मोठमोठी अमृततुल्य उभी राहिली आहेत. मात्र, सध्या लॉकडाऊनमुळे चहाचे सर्वच स्टॉल बंद असल्याने एकीकडे चहाशौकिन बेचैन झाले आहेत तर दुसरीकडे चहाविक्रेत्यांनाही मोठा आर्थिक फटका बसला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चहाचे नुसते नाव काढले तरी चेहऱ्यावर तरतरी येते. अनेकांची सकाळी व सायंकाळी चहाची वेळ निश्‍चित असते. पोटाची भूक भागविण्यासाठी ज्याप्रमाणे अन्नपाण्याची गरज असते. त्याचप्रमाणे चहा देखील अनेकांची गरजच बनली आहे. चहा शौकिनांची हीच गरज ओळखून ठिकठिकाणी चहाच्या टपऱ्या उभ्या राहिल्या.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मागील पाच-सहा वर्षांपासून तर चहा विक्रीकडे मोठा व्यवसाय म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. त्यामुळे मोठमोठ्या ब्रॅंडच्या नावाखाली चहाचे मोठे स्टॉल सुरू झाले आहेत. हे स्टॉल सुरू करण्यासाठी दोन लाखांपासून तब्बल दहा लाखापर्यंत फ्रॅंचाईजी दिली जात आहे. यासह वीस हजारांपासून चाळीस हजार रुपये दुकानाला भाडे देऊन स्टॉल सुरू केले आहेत. मात्र, लॉकडाऊनमुळे चहाचे सर्वच स्टॉल बंद असल्याने या व्यवसायाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. यासह चहा शौकिनांचाही हिरमोड झाला आहे. 

Marathi moral-inspiring story |

चहाच्या टपरीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह 

छोट्या टपरीवर चहा विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे. टपरीवर दररोज किमान एक ते पाच हजार रुपयांचा धंदा केला जातो. तर मोठ्या ब्रॅंडच्या दुकानांमध्ये दररोज साधारण पंधरा ते वीस हजारांची उलाढाल केवळ चहा विक्रीतून होत असते. चहा विक्रीच्या व्यवसायातून किमान दीड हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. 
----------------------------- 
पिंपरी-चिंचवड शहरात चहा विक्रीची मोठी दुकाने - सुमारे 100 

छोट्या टपऱ्या सुमारे-1500 
--------------------------- 
चहाचे प्रकार 

साधा चहा, स्पेशल चहा, मसाला चहा, मटका चहा, गुळाचा चहा, इराणी चहा, ब्लॅक टी, लेमन टी, ग्रीन टी. 
-------------------------
कपबशीचा ट्रेंड 

चहाचा दर 10 ते 12 रुपये आकारला जातो. पूर्वी किटलीतील दहा कपबशीमध्ये दिला जायचा. मात्र, कपबशीची जागा छोट्या काचेच्या ग्लास घेतली होती. मात्र, आता पुन्हा कपबशीमध्येच चहा देण्याचा "ट्रेंड' सुरू झाला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
-----------------------------
आकर्षित करणारे स्लोगन 

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानांच्या फलकांवर वेगवेगळ्या स्लोगनचा वापर केला जात आहे. यामध्ये कवितांचाही समावेश असल्याचे पाहायला मिळते. या माध्यमातून चहाचे महत्व पटवून दिले जात आहे. 
------------------------------- 
भेट व गप्पांचे ठिकाण 

चहाचा स्टॉल म्हटले की मित्रमंडळींनी एकत्रित येत गप्पा मारण्याचे ठिकाण हे जणू समीकरणच बनले आहे. चहाचा आस्वाद घेत या स्टॉलवर मनमोकळ्या गप्पा रंगलेल्या पाहायला मिळतात. वैयक्तिक विषयांसह अगदी राष्ट्रीय पातळीवरील मुद्यांचादेखील या गप्पांमध्ये समावेश असतो. 

यस्य गृहे चहा
------------------------------- 
सोशल मीडियावर व्यक्त करताहेत भावना 

चहाशौकिन सध्या एखाद्या प्रेयसीप्रमाणे चहाला "मिस' करीत आहेत. याबाबत सोशल मीडियावर देखील चहाशौकिन त्यांच्या भावना व्यक्त करताना दिसून येत आहेत. आवडता चहा उपलब्ध होत नसल्याने आपण किती बेचैन आहोत, हे शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tea lover wants to Reopen Tea Stalls