'टीचर ब्लॅक डे'ची सोशल मिडीयावर मोहीम...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 September 2020

एकीकडे शिक्षक दिनानिमित्त अनेकांना शुभेच्छा देण्यात येत आहेत, तर दुसरीकडे विनाअनुदानित शाळांमध्ये 20 वर्षांपासून बिनपगारी काम करणाऱ्या शिक्षकांनी शिक्षक "दीन' म्हणत सरकारचा निषेध केला आहे. तसेच, शिक्षक दिन हा काळा दिवस म्हणून पाळला. काही शिक्षकांनी "टीचर ब्लॅक डे' अशी मोहीम फेसबूक, इन्स्टाग्राम आणि ट्‌विटरवर चालवली आहे.

पिंपरी : एकीकडे शिक्षक दिनानिमित्त अनेकांना शुभेच्छा देण्यात येत आहेत, तर दुसरीकडे विनाअनुदानित शाळांमध्ये 20 वर्षांपासून बिनपगारी काम करणाऱ्या शिक्षकांनी शिक्षक "दीन' म्हणत सरकारचा निषेध केला आहे. तसेच, शिक्षक दिन हा काळा दिवस म्हणून पाळला. काही शिक्षकांनी "टीचर ब्लॅक डे' अशी मोहीम फेसबूक, इन्स्टाग्राम आणि ट्‌विटरवर चालवली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात 50 विनाअनुदानित शाळा, महाविद्यालये आहेत. त्यात तीनशेहून शिक्षक व प्राध्यापक आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरवर्षी राज्य सरकारकडून अनुदान घोषित केले जात आहे. परंतु, विनाअनुदानित शिक्षकांचा प्रश्‍न कायमच आहे. त्यामुळे राज्यभराबरोबरच शहरातील विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांनी काळा दिवस पाळण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार प्रत्येकांनी विनाअनुदानित हा कलंक मिटलाच पाहिजे, यासाठी "टीचर ब्लॅक डे' अशी मोहीम फेसबूक, इन्स्टाग्राम आणि ट्‌विटरवर चालवली आहे. अनेकांनी व्हॉट्‌सअॅपवरील डीपी व स्टेटसला ""20 वर्षांच्या विनाअनुदानित काळात राज्यातील सत्तेवर आलेल्या ज्या-ज्या सरकारांनी शिक्षकांना वाईट दिवस आणून ठेवले, अशा प्रत्येक राजकीय पक्षाला, पक्षप्रमुख व पक्षनेत्याला काळ्या शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,'' असे ठेवले आहे.

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण नागरिकांना बेडअभावी मिळेनात वेळेत उपचार

18 ते 20 वर्षांपासून विनावेतन राबत असलेल्या उच्च माध्यमिक शिक्षकांना न्याय देण्यात अपयशी ठरलेल्या राज्य सरकारचा शिक्षक दिनादिवशी जाहीर निषेध नोंदविला आहे. तर ""काही राज्यात 60 हजार शिक्षक उपाशी आहेत. त्या राज्यात शिक्षक दिन साजरा करण्याची गरजच नाही,'' शुभेच्छांपेक्षा पगार मिळाला असता, तर जास्तच बर झालं असतं,'' अशीही खंत काहींनी व्यक्त केली.
 

 

अजून किती वर्षे शिक्षक दिन काळा दिवस म्हणून साजरा करायचा? पुरोगामी महाराष्ट्रात गेली 19 वर्षे विद्यादानाचे पवित्र कार्य करणारा शिक्षक आज उपाशी आहे. मागच्या सरकारने पाच वर्षे कुठलेच अनुदान दिले नाही. सध्याच्या सरकारला एक वर्षे झाले असून, नुसते आश्‍वासन देत आहे. त्यामुळे आज राज्य सरकारचा काळा दिवस पाळून जाहीर निषेध करत आहोत.
- संतोष काळे, विनाअनुदानित शिक्षक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teacher Black Day's campaign on social media