भोसरीत विचित्र अपघात; ट्रकची तीन वाहनांना धडक, तर टेंपो चालकाचा मृत्यू

भोसरीत विचित्र अपघात; ट्रकची तीन वाहनांना धडक, तर टेंपो चालकाचा मृत्यू

पिंपरी : भरधाव ट्रकचालकाने तीन चाकी टेंपोला धडक दिल्यानंतर टेंपो काही अंतरापर्यंत ओढत नेला. चालक टेंपोतून बाहेर पडल्यानंतर ट्रकचे चाक त्यांच्या डोक्‍यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर ट्रकचालकाने रस्त्यावरील इतरही वाहनांना धडक दिली. ही घटना भोसरी येथे घडली. 

शिवाजी बाजीराव दंडवते (वय ३२, रा. लांडगेवस्ती, भोसरी) असे या अपघातात मृत्यू झालेल्या टेंपोचालकाचे नाव आहे. याप्रकरणी प्रदीपसिंग विजयसिंग सोधा (वय २९, रा. गुजरात) या ट्रकचालकाला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी शनिवारी (ता. ८) दुपारी साडेबाराच्या सुमारास अंमली पदार्थांचे सेवन करून भरधाव पुणे-नाशिक महामार्गावरून पुण्याच्या दिशेने जात होता. भोसरीतील गुरुवर्य भोसरीकर ज्ञानोबा भिकाजी लोंढे पादचारी पुलाजवळून जात असताना आरोपीने त्याच्या ट्रकपुढे चाललेल्या दंडवते यांच्या टेंपोला जोरदार धडक दिली. यामध्ये दंडवते यांचा टेंपो ट्रकला अडकला. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दंडवते देखील टेंपोतच अडकलेले होते. तरीही आरोपीने ट्रक तसाच वेगात पुढे नेला. काही अंतरावर गेल्यानंतर दंडवते टेंपोतून बाहेर पडले असता ट्रकचे चाक त्यांच्या डोक्‍यावरून गेले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने एका मोटारीसह रिक्षालाही धडक दिली. यामध्ये या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच रिक्षाचालक जखमी झाला. याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, आरोपीला अटक केली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com