Crime: सराईत गुंडाने माजवली दहशत

एरियाचा भाई असल्याचे धमकावत मारहाण करून ऐवज लुटला
 pune crime police
pune crime policeesakal

पिंपरी - 'मी या एरियाचा भाई आहे, अख्खं पिंपरी-चिंचवड मला घाबरतय, अशी धमकी देत कोयता मिरवत सराईत गुंडाने दहशत माजवली.

या गुंडासह त्याच्या साथीदारांनी सतरा वर्षीय मुलाला हॉटेलच्या बाहेर ओढत बेदम मारहाण केली. त्याच्याकडील ऐवज लुटला. याप्रकरणी पाच जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल आला आहे. हा प्रकार वाकडमधील काळाखडक झोपडपट्टी येथे घडला.

 pune crime police
Mumbai News : बिबट्याचा हल्ल्यात जखमी झालेल्यास वन विभागाचे आर्थिक सहाय्य

सराईत गुंड शाहरुख खान (वय २५) व बाळा लोखंडे (वय २५, दोघेही रा. काळाखडक झोपडपट्टी, वाकड) यांना पोलिसांनी अटक केली असून आनंद वाल्मिकी (वय २७), जुबेर खान (वय २०) व विष्णू कांबळे (वय २१, सर्व रा.काळाखडक झोपडपट्टी, वाकड) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

सागर अरुण कदम (वय १७, रा. जगतापनगर, थेरगाव) याने फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्याचे मित्र हे काळखडक येथील एका हॉटेलात जेवण करीत होते. त्यावेळी आरोपी बाळा फिर्यादीजवळ येऊन 'आमचे भाईला बघायची लायकी आहे का.

तू आमचे भाईकडे का बघितले' असे म्हणाला. त्यावर फिर्यादी याने त्यास बघितले नाही असे सांगितले असतानाही बाळा व शाहरुख यांनी फिर्यादीला हॉटेलच्या बाहेर ओढत नेले. शाहरुखने 'मी कोण आहे तुला माहित आहे का' असे म्हणत त्यांना लाथाबुक्क्यांनी मारायला सुरुवात केली.

त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी फिर्यादीने आरडाओरडा केला असता दहशतीने परिसरातील लोक व फिर्यादीचे मित्र तेथून सैरावैरा पळून गेले. त्यावेळी इतर आरोपींनीही फिर्यादीला मारायला सुरुवात केली.

 pune crime police
Mumbai Local: मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री ब्लॉक! 'या' लोकल रद्द; जाणून घ्या सविस्तर

शाहरुखने फिर्यादीच्या तोंडावर मारून त्याच्या खिशातील तीन हजारांची रोकड काढून घेतली. 'मी या एरियाचा भाई आहे, शाहरुख भाई आहे, अख्खं पिंपरी-चिंचवड मला घाबरतय, आणि तू मला नडतो काय, तुला आता सोडत नाही'

अशी शाहरुखने धमकी दिली. त्यानंतर कोयता हातात घेऊन 'थांब आता तुला सोडत नाही, तुला खल्लासच करतो' अशी धमकी दिली. हे पाहून परिसरातील दुकानदारांनी दहशतीने दुकाने बंद केली. शाहरुख खान हा रेकॉर्डवरील गुंड असून त्याच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com