चित्रपटगृहांवर ‘पडदा’च

Theater
Theater

पिंपरी - वेळ, दुपारी एकची. ठिकाण, पिंपरीतील मध्यवर्ती चौकातील नामांकित सिनेमा हॉल. परिसरात केवळ पालापाचोळाच साठलेला. सर्व काचांवर धूळ. नवीन सिनेमा यायचा तेव्हा होर्डिंग झळकायचे. तिथे आता ‘काउंटर क्लोज्ड’चा फलक. सिनेमा हाउसफुल्ल बोर्ड झळकणाऱ्या ठिकाणी आता केवळ उरलेत लोखंडी सांगाडे. कोरोनाच्या दहशतीमुळे चित्रपटगृहांकडे प्रेक्षकांनी पाठ केली. त्यामुळे साहजिकच बुकिंग बंद झाले. परिणामी, चित्रपटगृहांवर सध्या तरी ‘पडदा’ पडल्याचे वास्तव दिसून येते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अशी व्हायची गर्दी

  • तरुणाईचे वीकेंड सेलिब्रेशन चित्रपटगृह व मॉलमध्ये व्हायचे
  • ऑफलाइन तिकिटासाठी देखील लागायच्या रांगाच रांगा
  • ऑनलाइन बुकिंगही होते जोमात
  • हाउसफुलचा फलक पडायचे नजरेस 
  • सिनेमाच्यावेळेत पार्किंगसाठीही लागायच्या रांगा
  • ऑक्टोबरमध्ये परवानगी मिळूनही सोशल डिस्टन्सिंगमुळे प्रेक्षकांमध्ये नाराजी

सद्यःस्थिती

  • पिंपरी, आकुर्डी, पिंपळे-सौदागर, चिंचवड, वाकड, स्पाइन रोड भागात चित्रपटगृहांमध्ये शुकशुकाट
  • परवानगी मिळूनही चित्रपटगृहे रसिकांअभावी निर्जीव
  • गेल्या दहा महिन्यांपासून ही चित्रपटगृहे बंद
  • करोडो रुपयांची उलाढाल झाली ठप्प
  • गर्दीअभावी चित्रपटगृहांना अवकळा
  • मॉलमधील सिनेमागृहाबाहेर केवळ सुरक्षारक्षक

चित्रपटगृह मालक आशादायी

  • पुढील महिन्यात काही चांगले चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता
  • कन्नड व तेलगूमधील सिनेमे येणे अपेक्षित
  • मराठीतील चांगले सिनेमे पुढील महिन्यात येणार

चित्रपटगृह मालकांची स्थिती

  • सध्या इतर भाषेतील मोजकेच चित्रपट प्रदर्शित होत असल्याने संकट
  • चित्रपटगृहाचा देखभाल-दुरुस्तीचा खर्चही परवडत नाही
  • वीजबिल, मालमत्ता कर व पाणीबिल भरण्याचीही नामुष्की
  • सध्या एक (सिंगल) व बहुपडद्यावरील (डबल) चित्रपटगृहे नावाला खुली
  • चित्रपटगृहांमधील मनुष्यबळ देखील कपात
  • मास्क, सोशल डिस्टन्सिंग, पेपरलेस तिकीट, थर्मल स्क्रिनिंग, क्यूआरकोड पेमेंट सिस्टीमची यंत्रणा
  • सिनेमागृह निर्जंतुकीकरण करण्याची घेतली जातेय दक्षता
  • रोजचे तीस ते चाळीस नागरिकांचे बुकिंग
  • अनेकांनी चित्रपटगृह बंद ठेवणेच पसंत
  • करमणूक कर, कर्मचाऱ्यांचे पगार होत नसल्याने हैराण

चित्रपटगृहांची संख्या

  • ४ सिंगल स्क्रीन
  • ९ डबल स्क्रीन
  • १०-१२ - स्टुडिओ
  • ३००-४०० - आसनक्षमता सिंगल स्क्रीन
  • १५०-२०० - मल्टिप्लेक्स

सांस्कृतिक मंत्रालयाकडून नियमावली सर्वांना पाठवली आहे. त्यानुसार नियमांचे पालन सुरू आहे. चित्रपटगृह बंद असूनही कोरोनाकाळात वीजबिले आली. देखभाल-दुरुस्तीचा खर्च वाढला. सध्या मनुष्यबळही कमी केले आहे. कर्जाचा बोजा वाढत चालला आहे. दैनंदिन शो संख्येवर मर्यादा आल्याने बऱ्याच निर्मात्यांनी चित्रपट मागे घेतले आहेत. कित्येकांनी चांगले चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या कोरोनाची लाट आल्यानेदेखील नागरिक धास्तावले आहेत.
- मच्छिंद्र धुमाळ, सिंगल स्क्रीन चित्रपटगृह मालक, वाकड

मी सध्या नवोदित कलाकारांप्रमाणेच चित्रपटातील बड्या गोष्टींचे स्वप्न पाहत होतो. परंतु आता यूट्युब चॅनेल सुरू करून वेबसीरिज सुरू केली आहे. सिनेमांचे बजेट खिशाला परवडणार नाही. सध्या मोबाईलवरच चित्रपट पाहण्याचा जमाना आहे. पर्याय शोधणे गरजेचे आहे. कधी क्रू वापरणारे आम्ही मात्र, आता डीआयवर काम करीत आहोत. सर्वच ठिकाणी कपातीचा विचार करून काम सुरू आहे. अगदी महागडे कॅमेरे न वापरता आयमॅकवर आम्ही वेबसीरिज करीत आहोत.
- मंगेश बदर, दिग्दर्शक, वेबसीरिज

मित्रांसोबत सिनेमा पाहण्याचा आनंद निराळाच असतो. तो जगण्याचा क्षण मी कधीच सोडत नाही. कामानिमित्त मुंबई, ठाणे या ठिकाणी फिरतो, त्या वेळी प्रत्येक शहरात मी एक तरी सिनेमा पाहतच असतो. सिनेमा आयुष्य कशा पद्धतीने जगायचे याचा मार्ग दाखवतो.
- रणजित शेलार, फोटोग्राफर, भोसरी

मी कधीच फर्स्ट डे फर्स्ट शो सोडला नाही. मराठी व हिंदी चित्रपटांची तितकीच आवड आहे. व्यवसायाने फोटोग्राफर असल्याने सिनेमाही तितकाच प्रचंड आवडतो. जगण्याची नवी उमेद मिळते.   
- जयजित मोरे, सिनेऑटोग्राफर, मोशी 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com