मेडिकलमधून त्याने 'त्या' वस्तू चोरल्या, जे बघून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल!

मेडिकलमधून त्याने 'त्या' वस्तू चोरल्या, जे बघून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल!

पिंपरी : चोरट्यांनी घरफोडी किंवा दुकान फोडल्याची घटना उघडकीस आल्यास अनेकदा अशा घटनेत किंमती माल चोरीला गेल्याचे समोर येते. मात्र, मोशी येथे घडलेल्या घटनेत चोरट्यानी मेडिकल दुकानाचे शटर उचकटून रोख रकमेसह चक्क चॉकलेट, डिओ, परफ्युम व हेअर ऑईल हे चोरून नेल्याने ही घटना चर्चेचा विषय बनली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

लॉकडाउनमुळे कमी झालेले गुन्ह्यांचे प्रमाण लॉकडाउन शिथील होताच पुन्हा वाढले आहे. रोजगार नसल्याने तसेच घरखर्चाला पैसे नसल्याने कौटुंबिक कलह वाढले आहेत. यासह चोरीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. एरव्ही चोरीच्या घटनेत रोख रकमेसह किंमती वस्तू चोरीला गेल्याचे उघडकीस यायचे. मात्र, आता तर चोरटे रोख रकमेसह किरकोळ वस्तूंसह सौंदर्यप्रसाधने देखील चोरत असल्याचे असल्याचे समोर येत आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मोशीत अशीच घटना घडली. मोशीतील शिव रस्त्यावरील कुमार प्रिन्सविले सोसायटीत संध्या यतीन देशमुख यांचे मेडिकलचे दुकान आहे. या दुकानाचे शटर उचकटून चोरटे आत शिरले. ड्रॉवरमधील 35 हजारांची रोकड यासह चॉकलेट, डिओ, परफ्युम, हेअर आईल असा एकूण 39 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना बुधवारी (ता. 27) सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून अधिक तपास सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com