भल्या पहाटे चोरटा एटीएम सेंटरमध्ये शिरला आणि...वाचा पुढे काय घडले?

ATM-Theft
ATM-Theft

पिंपरी - एटीएम मशिनचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी रोकड चोरण्याचा प्रयत्न केल्याची घटना म्हाळुंगे येथे उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सुशांत रामचंद्र सातपुते यांनी फिर्याद दिली आहे. हिंजवडीजवळील म्हाळुंगे येथील नांदे रोडवर ऍक्‍सिस बॅंकेचे एटीएम सेंटर आहे. फिर्यादीवर या सेंटरच्या देखरेखीची जबाबदारी आहे. दरम्यान, मंगळवारी (ता. 11) पहाटे तीनच्या सुमारास अज्ञात चोरटा या एटीएम सेंटरमध्ये शिरला. एटीएम मशिनचा पुढचा दरवाजा उचकटून त्याच्यातील कॅश काऊंटरचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करीत त्यातील रोकड चोरण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मशिनचे तीन हजार रूपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

ही दिवसांपूर्वी शहरात सुरु असलेले एटीएम फोडीचे सत्र थांबले होते. मात्र, आता पुन्हा एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com